इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेर येथे दिवाळी पहाट.

62

इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेर येथे दिवाळी पहाट.

इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेर येथे दिवाळी पहाट.
इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेर येथे दिवाळी पहाट.

अनिल अडकिने

सावनेर तालुका प्रतिनिधी.9822724136

सावनेर,07नोव्हें:- नरक चतुर्दशी (दिवाळी) च्या निमित्ताने आय एम ए सावनेर च्या वतीने मराठी हिंदी भक्ती व भावगीतांचा सुमधुर कार्यक्रम म्हणजे दिवाळी पहाट चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सादर करते नागपूर शहरातील सुप्रसिद्ध स्वर रंग म्युझिकल ऑर्केस्ट्रा ग्रुप होते. कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध कलाकार श्री संजय ठोसर व महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कृत सुप्रसिद्ध गायक शंकरजी ठोसर यांनी प्रमुख सूत्रधार सांभाळले.

कार्यक्रमाची सुरुवात आय. एम. ए सावनेर चे अध्यक्ष डॉक्टर निलेश कुंभारे व आय ए पी चे नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. विजय धोटे व शाखेचे पदाधिकारी डॉ. परेश झोपे, डॉ. विलास मानकर, डॉ. चंद्रकांत मानकर, डॉ. आशिष चांडक, डॉ. सोनाली कुंभारे, डॉ. मोनाली फोटो यांनी दीप प्रज्वलन करून केले. याप्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेरचे सदस्य तसेच निमा व होमिओपेथीक असोसिएशन सावनेर चे इतर सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमा प्रसंगी डॉ. चंद्रकांत मानकर, सौ. रजनी मानकर, डॉ. नितीन पोटोडे, डॉ. मोनाली पोटोडे, डॉ. उमेश जीवतोडे, डॉ. पूजा जीवतोडे, डॉ. विलास मानकर, डॉ. गौरी मानकर, डॉ. सचिन घटे, डॉ. विजय घटे, डॉ. अमित बाहेती, डॉ. अंकिता बाहेती, डॉ. अशिष चांडक, डॉ. रेणुका चांडक, सौ. चित्रा झोपे, डॉ. प्रशांत गोडसे, डॉ. दुबे, डॉक्टर संजय दोरखंडे, डॉ. स्वप्नील काळे, डॉ. सुरेंद्र गेडाम, डॉ. मर्फी , डॉ. अशोक जयस्वाल व इतर डॉक्टर मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयएमएचे सचिव डॉ. परेश झोपे यांनी केले.