अहमदगरमध्ये शासकीय रुग्णालयाला भीषण अग्नी तांडव, 10 कोरोना बाधित रुग्णाचा होरपळून मृत्यू.

41

अहमदगरमध्ये शासकीय रुग्णालयाला भीषण अग्नी तांडव, 10 कोरोना बाधित रुग्णाचा होरपळून मृत्यू.

अहमदगरमध्ये शासकीय रुग्णालयाला भीषण अग्नी तांडव, 10 कोरोना बाधित रुग्णाचा होरपळून मृत्यू.
अहमदगरमध्ये शासकीय रुग्णालयाला भीषण अग्नी तांडव, 10 कोरोना बाधित रुग्णाचा होरपळून मृत्यू.

मीडिया वार्ता न्यूज प्रतिनिधी

अहमदनगर:- अहमदनगर मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अहमदनगर शहरातील सरकारी रुग्णालयात भीषण अग्नी तांडव मुळे लागलेल्या आगीत 10 कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर काही इतर रुग्ण गंभीररित्या जखमी झाले आहे. अहमदनगर मधील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला ही आग लागली. शॉटसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीच्या घटनेने नगर शहर आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

सर्वीकडे दिवाळीचा उत्साह सुरु असताना अहमदनगर मध्ये दुर्दैवी घटनेने हादळले आहे. आज सकाळी साडे दहाच्या सुमारास सरकारी रुग्णालयाला आग लागली. ग्राऊंड फ्लोअरवर अतिदक्षता विभागाला आग लागली. या विभागात कोरोनाचे रुग्ण उपचार घेत होते.

आग लागताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. पण आग मोठी होती. काही वेळातच आगीने संपूर्ण अतिदक्षता विभाग व्यापला. याच विभागातील 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. जवळपास दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलं.

मृत्यू झालेले सर्व रुग्ण कोरोनाबाधित

रुग्णालयातील ICU विभागात एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा कोरोनाविरोधी लढा सुरु होता. मात्र आज आग काळ बनून आली. शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत यातील 10 रुग्णांचा भाजून मृत्यू झाला आहे. सर्व रुग्ण हे कोरोनाबधित होते.

“आयसीयूमध्ये 17 रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झालेला आहे. प्राथमिक माहितीत शॉर्ट सर्किटने आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आगीसंबंधी पुढील चौकशी सुरु आहे”, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भोसले यांनी दिली आहे.