*गोंडपिपरी तालुक्यातील किरमीरी येथे सोयाबीन चा ढिग जळुन खाक*
*लाखोंचे नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी*

*लाखोंचे नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी*
राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी- गोंडपिपरी तालुक्यातील किरमिरी येथील शेतकरी बंडु रामटेके यांच्या शेतातील सोयाबीन चा ढग जळुन खाक झाल्याची घटना गुरुवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली
यात लाखो रुपयांची सोयाबीन जळुन खाक झाली
सध्या स्थीतीत खरिप हंगामातील सोयाबीन पीक काढणीला वेग आला आहे अशातच अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिक काढणे केली असली तरी काही शेतकऱ्यांचा सोयाबीन चा ढिग अद्यापही शेतातच दिसून येत आहे
किरमिरी येथील रहिवासी असलेले शेतकरी बंडु रामटेके यांनी सोयाबीन ची शेती उभी केली शेतात सोयाबीन पेरणी केली निसर्गाने साथ दिली पिक जोमाने आले यांच्या शेतात सोयाबीन चा ढिग होता लवकरच सोयाबीन काढणी करणार या बेतात रामटेके होते मात्र सणासुदीचे दिवस सुरू झाले यामुळे पिकाची काढणी होऊ शकली नाही
शेतकरी रामटेके यांनी दिवाळी असल्याने घरी कुटुंबासमवेत उत्सव साजरा करत होते सायंकाळी 8वाजत्याच्या सुमारास शेतात असलेल्या सोयाबीन च्या ढिगाऱ्याला आग आगल्याची माहिती कळताच रामटेके परीवाच्या पायाखालची जमीनच सरकली आणि शेताकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत 35 ते 40 किंटल सोयाबीन जळुन खाक झाले होते नूकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे