घरात घुसून महिलेची छेडखाणी करणाऱ्यास अटक… घुगुस .

56

घरात घुसून महिलेची छेडखाणी करणाऱ्यास अटक… घुगुस .

घरात घुसून महिलेची छेडखाणी करणाऱ्यास अटक... घुगुस .
घरात घुसून महिलेची छेडखाणी करणाऱ्यास अटक… घुगुस .

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob… 9834024045

शुक्रवार 5 नोव्हेंबर रोजी रात्री 9:15 वाजता दरम्यान आरोपी मोसीम अहमद उर्फ कलवा मोहम्मद इस्लाम (30) रा. घुग्घुस यास पोलिसांनी अटक केली तर एक आरोपी अद्याप फरार आहे.
घुग्घुस येथील सुभाषनगर क्वार्टर नं एम क्यू 197 येथे राहणाऱ्या एका महिलेवर दिनांक 4 नोव्हेंबरला रात्री 11 वाजता घरात असतांना आरोपी कलवा व नाझिम यांनी दारू पिऊन घरात घुसून बलात्कार करण्याची धमकी देत छेडखाणी केली पती रामेश्वर गोरे हे घरी येताचा हा प्रकार दिसताच त्यांनी हटकले असता त्यांना विटाने मारहाण केली व क्वार्टरचा जिना लाथ मारून तोडला पती व पत्नीनी लगेच घुग्घुस पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली कलम 452, 509, 504, 506 (34) गुन्हा दाखल करण्यात आला असून हे दोन्ही आरोपी फरार झाले होते.
फिर्यादी महिला मुलगा मुलगी व आई सह घरी पती घरी येण्याची वाट पाहत होती पती ट्रान्सपोर्ट कंपनीत चालकाचे कामावर जातो समोरच्या खोलीत झोपून असतांना कलवा व नाझिम या दोन युवकांनी दारू पिऊन घरात प्रवेश करून महिलेस बलात्कार करण्याची धमकी देत छेडखाणी केली तितक्यात पती रामेश्वर हा कामावरून घरी परतला असतांना पतीने दोन युवकांस हटकले असतांना त्यांनी मारहाण करणे सुरु केले.
घरात घुसून मारहाण झाल्याने गोरे कुटुंब भयभीत झाले आहे त्यांनी गुन्हेगार वर कारवाही करण्याची मागणी केली होती.आरोपी मोसीम अहमद उर्फ कलवा मोहम्मद इस्लाम यांचे वर अनेक गुन्हे दाखल असून तो युवक काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता आहे.