समता सैनिक दल शाखा हिंगणघाटचा एस.टी महामंडळाच्या विलनीकरण्याच्या लढ्याला पाठिंबा.

✒ प्रशांत जगताप ✒
कार्य. संपादक मिडिया वार्ता न्युज
📲9766445348📲
हिंगणघाट:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण यासह एस.टी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी समता सैनिक दलाने एस.टी महामंडळाच्या सुरू असलेल्या कामबंद आंदोलनाला आदोलनस्थळी भेट देऊन संपाला पाठिंबा जाहीर केला.
दिनांक 27 ऑक्टोबर पासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंळाच्या सुरू असलेल्या आंदोलनातून खालील प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने…
● महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलिनीकरण करावे.
● राज्य परिवहन महामंडळाचा अर्थसंकल्प राज्याच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात यावा (उदा.रेल्वेचा अर्थसंकल्प केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात समाविष्ट)
● एस.टी कामगारांना समान काम, समान दाम या तत्वावर किमान वेतन कायद्यानुसार 1 एप्रिल 2016 पासून 18000/- रुपये मुळ वेतन (बेसिक) मिळावा.
● 7 व्या वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठता प्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यात यावे. आदी मागण्यांचा समावेश करण्यात आलेल्या आहे.
यावेळी आदोलनस्थळी समता सैनिक दल हिंगणघाट शाखेचे प्रशांत मेश्राम, प्रफुल मेश्राम, व्रुषभ सावरकर, प्रज्वल खैरे, अल्केश भोंगाडे,अंकुश पखाले, योगेश रामटेके, आकाश रामटेके, अमोल रामटेके, अतुल रामटेके, स्मिता कांबळे, किरण बहादे यांच्यासह मोठ्या प्रमाणात हिंगणघाट आगारातील कर्मचारी उपस्थित होते.