आज आहे विद्यार्थी दिवस, का साजरा केला जातो हा दिवस? बघा या संबधी रोचक माहिती.

54

आज आहे विद्यार्थी दिवस, का साजरा केला जातो हा दिवस? बघा या संबधी रोचक माहिती.

आज आहे विद्यार्थी दिवस.
आज आहे विद्यार्थी दिवस.

लेखक: प्रशांत जगताप
कार्य संपादक मिडिया वार्ता न्युज
9766445348
आज 7 नवंबर 2021 ला देश भरात विद्यार्थी दिवस साजरा करण्यात येत आहे. आजच्या दिवशी म्हणजेच 7 नोव्हेंबर 1900 ला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्रातील सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये पहील्या वर्गात दाखला करण्यात आला होता. 7 नोव्हेंबर म्हणजेच आज ते पहिल्यांदा विद्यालयात गेले होते. त्यामूळे या दिवसाला विद्यार्थी दिवसाच्या रूपात साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक जीवनाची 7 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली. बाबासाहेबांना लहानपणी भिवा म्हणत. शाळेच्या त्या वेळच्या रजिस्टरमध्ये 1914 क्रमांकाच्या समोर त्यांची स्वाक्षरी आहे. हा दस्तऐवजही शाळेने जपून ठेवला आहे.

हिच ती डॉ. बाबासाहेबाची पहिली शाळा
हिच ती डॉ. बाबासाहेबाची पहिली शाळा

या दिवसाला अस्मर्णीय बनवण्यासाठी 2017 पासुन 7 नोव्हेंबर ला विद्यार्थी दिवस उत्साहवर्धक वातावरण साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थी दिवसाचा निमीत्ताने महाराष्ट्रसह देशात अनेक महाविद्यालयात, कॉलेज, शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. या दिवशी विद्यार्थी जिवनावर शाळांमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित व्याख्याने, निबंध स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात सांगण्यात आले आहे.

प्रतापसिंह हायस्कूल सातारा
प्रतापसिंह हायस्कूल सातारा

कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात शिक्षणामुळे क्रांती घडली. त्यांनी ज्ञानाच्या जोरावरच भारतीय समाजात क्रांती घडविली. जगात गौरव होत असलेल्या भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार ते ठरले. ते आजन्म विद्यार्थी होते. म्हणून त्यांचा शाळाप्रवेश दिवस राज्यात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक महान सामाजिक उद्धारक, एक कर्तुत्ववान नेता, भारतिय महिलाचे उद्धारक, प्रसिद्ध राजकारणी नेता, प्रख्यात न्यायविदीत्न, दार्शनिक, मानवविज्ञान, इतिहासकार, लेखक, अर्थशास्त्री, विद्वान, संपादक आणि संविधानचे शिल्पकार अशा विविध विशेषणाने संबोधण्यात येत असते. त्यांच्या कार्यानेच आज भारत देश एक संध आहे. जगात आज अनेक देश होत्याचे नव्हते झाले आहे. पण बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या दुरदूष्टी मुळेच आज भारत एक आदर्श लोकशाही देश म्हणून उभा आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी आपल पुर्ण जिवन देश हित महिला, कामगार, गरीब, अनुसूचित जाती, आदिवासी, इतर माघास जातीला न्याय हक्क, अधिकार आणि अस्पृश्यता सारखी अंधमय गुलामगिरी ला पुर्णत लाते खाली तुडवुण खत्म करण्यासाठी संघर्ष केला. त्यानी देशातील अनेक महत्वपुर्ण पदावर कार्य केल. ते मजुर कामगार मंत्री, स्वत्रंत भारताचे कानून मंत्री होते. त्यांच्याच दुरदुष्टी कोणातून भारतीय रिजर्व बँकेची स्थापना झाली. त्याना 1990 मध्ये मरणोपरांत भारताचा सर्वोच्च नागरिक सम्मान भारतरत्न देऊन सम्मानित करण्यात आले.