मतदान जनजागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन
• 9 नोव्हेंबर रोजी निघणार रॅली
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 7 नोव्हेंबर
आगामी विधानसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन चंद्रपूर द्वारे 9 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय येथून जटपूरा गेट- गिरणार चौक- गांधी चौक या मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर रॅलीचा समारोप महानगरपालिका येथील पार्कींग मध्ये करण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार यांनी केले आहे.