Home latest News श्रीवर्धन जलपुरवठा योजनेचा चुराडा! दर्जाहीन कामामुळे वारंवार पाईप फुटी; लाखो लिटर फिल्टर...
श्रीवर्धन जलपुरवठा योजनेचा चुराडा!
दर्जाहीन कामामुळे वारंवार पाईप फुटी; लाखो लिटर फिल्टर पाणी रस्त्यावर वाया
निलेश भुवड
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
मो. 8149679123
श्रीवर्धन :- श्रीवर्धन शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची पुन्हा एकदा पाईप फुटी झाली असून, त्यामुळे लाखो लिटर फिल्टर पाणी रस्तावर वाया गेले आहे. भोस्ते ग्रामपंचायत हद्दीतील भट्टीचा माळ परिसरात ही पाईप लाईन फुटल्याने मुख्य रस्तावर व बाजूला पाणीच पाणी वाया जाताना दिसून येत आहे.
दर काही दिवसांनी नायर पेट्रोल पंप चढावा जवळ व इतर अनेक पाईप फुटीची पुनरावृत्ती होत असून, त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा नेहमीच विस्कळीत होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोट्यवधी रुपयांच्या निधीतून उभारलेली ही जलपुरवठा योजना दर्जाहीन कामामुळे अक्षरशः चुराडा झाल्याचे स्पष्ट दिसून येते.
नागरिकांच्या मते, “दर काही दिवसांनी पाईप फुटतो आणि नाल्यातून स्वच्छ (फिल्टर) पाणी वाहते; हे प्रशासनासाठी लाजिरवाणे आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.
सततच्या पाईप फुटीमुळे पाण्याची खूपच मोठ्या प्रमाणात नासाडी होत असते,
नागरिकांनी नगरपरिषद व जलपुरवठा विभागाकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच, दर्जाहीन काम करणाऱ्या आणि वारंवार बिघाड होणाऱ्या ठिकाणांवर काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याचीही जोरदार मागणी होत आहे.