वंदे मातरम् गिताची १५० वर्ष

72

वंदे मातरम् गिताची १५० वर्ष

प. पां. शास्त्री आठवले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने भारत मातेच्या स्तुतीचा गौरव दिन साजरा

म्हसळा: संतोष उध्दरकर.

म्हसळा: वंदे मातरम् ची १५० वर्ष पूर्ण होत असुन महाराष्ट्रात हा दिन साजरा करण्यात येत असल्याने पद्मविभूषण पांडुरंग शास्त्री आठवले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, म्हसळा यांच्या वतीने वंदे मातरम् गिताच्या १५० वर्षपूर्ती निमित्ताने भारत मातेच्या स्तुतीचा गौरव दिन म्हणुन न्यु इंग्लिश स्कूल म्हसळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी या संस्थेच्या माध्यमातुन वंदे मातरम् या गिताला १५० वर्ष पूर्ण झाल्या बद्दल विविध स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले होते या मध्ये चित्रकला, देश भक्तिपर गित,भाषण असे आयोजन करून या मध्ये अनेक विदयार्थ्यानी सहभाग नोंदवला असुन न्यु इग्लिश स्कूल म्हसळा या शाळेतील ईयत्ता आठवी मधील विद्यार्थी कु. स्वराज संतोष उध्दरकर याचा चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक,दिया बेटकर हिचा व्दीतीय तर सिध्दांत जाधव या विद्यार्थ्यांचा त्रितिय क्रमांक येऊन या तिन्ही विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी तहसिलदार सचिन खाडे, जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे, स्कुल चेअरमन समीर बनकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा चिटणीस महादेव पाटील, शाळा मुख्याध्यापक डि. आर. पाटील सर, एकनाथ पाटील सर,भाजप रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष निलेश मांदाडकर, भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक गिते, तसेच संस्थेचे सर्व शिक्षकवृंद, उपस्थित होते.