वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये सामुहिक गायन कार्यक्रम आयोजित

87

*वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये सामुहिक गायन कार्यक्रम आयोजित

अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076

भिवंडी:-  महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे दि. ३१.१०.२०२५ व दि. ०४-११-२०२५ च्या पत्रान्वये आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे मा.प्रशासक तथा आयुक्त श्री. अनमोल सागर (भा.प्र.से) यांचे निर्देशानुसार आज दिनांक ०७.११.२०२५ रोजी वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिका मुख्यालयात तळ मजल्यावर मा. उप-आयुक्त श्री. विक्रम दराडे यांच्या अध्यतेखाली अधिकारी / कर्मचा-यांसह वंदे मातरम गीताचे सामुहिक गायन आयोजित करण्यात आले, तसेच प्रभाग समिती कार्यालय, शाळांमध्ये देखील सामुहिक गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी मा. उपायुक्त (कर) श्री. बाळकृष्ण क्षिरसागर, श्री. जमील पटेल (शहर अभियंता) श्री. संदीप गाडेकर (वैद्यकीय आरोग्य अधिकारी), श्री अजित महाडिक (सहा.आयुक्त निवडणूक), श्री. सचिन नाईक (अति. शहर अभियंता) श्रीकांत परदेशी (माहित व जनसंपर्क अधिकारी ) व महानगरपालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.