विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा

50

विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा

विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा

✍मुकेश मेश्राम ✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
7620512045

लाखनी:- तालुक्यातील मुरमाडी/ तुप येथे स्व.निर्धनराव पाटील वाघये कला विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुप येथे विश्वरत्न, परमपूज्य, घटनापती ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.बी.बी .ढवळे सर होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे प्रा. विश्वास खोब्रागडे, प्रा. राहुल चुटे, प्रा. मिलिंद फुलझेले, प्रा. भुमेश्वरी वाघये उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विश्वास खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.बी.बी.ढवळे यांनी भारतातील जाती व्यवस्था निर्मूलनासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार व त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर विचार प्रकट केले.
प्रा. अर्चना निखाडे, प्रा. श्रीकांत भुसारी, प्रा. स्नेहा शामकुवर तसेच विद्यालयातील लिपिक खेमराज वाघाये, श्रीकांत धुर्वे, अजय मेश्राम ,ग्रंथपाल परिचर गितेश्वरी तरोणे, महाविद्यालयाचे शिपाई किशोर ननोरे, अमर जांभूळकर, तेजेंद्र सदावर्ती,
शोएब शेख तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिची उपस्थित होती. या कार्यक्रमाचे संचालन ग्रंथपाल विशाल गजभिये तर आभार प्रदर्शन महिंद्र फुलझेले यांनी केले.