हरिदास वाकुळकर आचार्य (पीएच.डी.)पदवीने सन्मानित..

✒अरुण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731
नागभीड : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,नागभीड तालुक्यातील कोर्धा येथील रहिवासी हरिदास मंगरू वाकुळकर यांना नुकतेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे इतिहास विषयात आचार्य पदवी (पीएच.डी.)पदवीने सन्मानित करण्यात आले.. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. रश्मी बंड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिवकालीन न्यायव्यवस्था एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर त्यांनी आपले संशोधन कार्य पूर्ण केले होते.. यापूर्वी त्यांनी इतिहास विषयात नेट सेट तसेच एम.फिल.उत्तीर्ण केलेले आहे.. नेट,सेट,एम.फिल. आणि पीएच. डी. प्राप्त केलेले डॉ.हरिदास वाकुळकर हे कोर्धा या गावातील पहिलेच व्यक्ती आहेत.. त्यांच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्रा.डॉ.रश्मी बंड मॅडम,प्रा.डॉ. रामटेके मॅडम,डॉ. रुपेश मेश्राम सर, प्रा.डॉ. चिकटे सर, प्रा.डॉ. कापगते सर, प्रा.डॉ. गिरडे सर,प्रा.डॉ. आदे सर, तसेच इतर गुरुजन,कुटुंबीय आणि मित्र परिवाराला दिले आहे..!!!