कळमेश्वर: भारतीय बौद्ध महासभे तर्फे महामानवास मानवंदना.

49

कळमेश्वर: भारतीय बौद्ध महासभे तर्फे महामानवास मानवंदना.

कळमेश्वर: भारतीय बौद्ध महासभे तर्फे महामानवास मानवंदना.
कळमेश्वर: भारतीय बौद्ध महासभे तर्फे महामानवास मानवंदना.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442📲

कळमेश्वर:- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तक्षशिला बुद्ध विहार समोरील पटांगणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुणभाऊ वाहने तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा हे होते. प्रमुख पाहुणे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कळमेश्वर तालुका अध्यक्ष दादाराव शिरसाट त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्या प्रमिलाताई जाधव, विजयजी झांबरे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव विठ्ठल जनबंधू हे उपस्थीत होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सदस्य विजयजी झांबरे त्यांनी पुष्पमाला अर्पण केली.

अध्यक्षीय भाषणात वाहने म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक ,आर्थिक, क्षेत्रात भरघोस कार्य केले. या देशात समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय यावर आधारित लोकशाही बघायला मिळते. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले नसते तर या देशातील 563 रियासती एकत्रित आल्या नसत्या. जगातील सुंदर अशी घटना या देशवासियांना मिळाली नसती या देशातील प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य त्याचप्रमाणे स्त्री पुरुष समानता बाबासाहेबांनी दिली म्हणून महापरिनिर्वाण दिनी आपण बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी प्रत्येकाने निळा ध्वजाखाली एकत्र यायला पाहिजे असे विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन राहुलजी वानखेडे सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा तालुका कळमेश्वर यांनी केले.

या कार्यक्रमाला तक्षशिला बुद्ध विहार ब्राह्मणीचे अध्यक्ष अर्चनाताई उके, सचिव शशिकला चणकापूरे, सुलोचना वाहने, दर्शना झामरे, राजकन्या पाटील, ललिता पाटील, ललिता खोब्रागडे, सौ. बागडे, सौ. सोमकुवर, सुनिता गोंडाणे, सौ. उघडे सह असे असंख्य संख्येने कार्यकर्ते हजर होते. आभार प्रदर्शन लताताई खडसे यांनी केले.