जमीन विषयक कायदे १९० निशुल्क व्याख्यानमाला संपन्न

62

जमीन विषयक कायदे १९० निशुल्क व्याख्यानमाला संपन्न

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी

मो. नं.९८६९८६०५३०

मुंबई- ०६ डिसेंबर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदराजंली म्हणून दिनांक ०४/१२/२०२२ रोजी”जमीन विषयक कायदे, ७/१२, दस्तैवज व महाराष्ट्र जमीन महसुल कार्यपध्दती व त्यासंदर्भातील प्रश्न” या विषयावर डॉ.ऍड. रंजना खोचरे आणि ऍड. सुनिल भडेकर यांचे १९० वे निशुल्क व्याख्यान दादर मुंबई येथे ‘समता सेवा मंडळ’ शिवकन्या शिवपुत्र, वांजळोशी, तालुका तळा रायगड या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. 

सदर व्याख्यानाला अनेक अभ्यासु व्यक्तींनी उपस्थिती दाखविली. त्याचबरोबर वकील, शिक्षकवर्ग, पदवीधर, शेतकरी, महसुल समन्वयक, तळा रायगड, कोकण विविध जिल्हे शेतकरी यांनी व्याख्यानाचा लाभ घेतला. ७/१२ व त्यांचे महत्त्वपूर्ण रखाने, कोकणातील जमीनी, बेदखल कुळे, इतर वतनी जागा, चुकीच्या वारस नोंदी, भूसंपादनात गेलेल्या जमीनी, मोबदला हक्क अधिकार, वंशावळी, आपले पुर्वज, सहहिस्सेदार नोंदी,महीलांचे जमीनीवरील हक्क अधिकार अशा विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

सदर कार्यक्रम निमिता गायकर, मनोहर चांदिवडे यांच्या उत्कृष्ट आयोजनाने संपन्न झाला.

व्याख्याते:

DR. RANJANA B. KHOCHARE

PHD IN LAW, LLM, LLB, MBA, DBM, DCL

Adv. Bombay High court 

SUNIL BHADEKAR

LLB, MBA(Finance)

महसुल अभ्यासक