वेकोलिच्या मुख्य महाप्रबंधकावर अ‍ॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल

45

वेकोलिच्या मुख्य महाप्रबंधकावर अ‍ॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल

वेकोलिच्या मुख्य महाप्रबंधकावर अ‍ॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351

भद्रावती : 7 डिसेंबर
वेकोली कामगाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी वेकोलिचे माजरी क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक वि. के. गुप्ता यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीट ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार किशोरीकांत जानकी चौधरी हे माजरी वेकोलि क्षेत्रातील फिटर प्लांटमध्ये मेकॅनिकल या पदावर कार्यरत आहेत. ते ऑल इंडिया एससी, ओबीसी, कौन्सिलचे अध्यक्ष आहे. किशोरीकांत यांची १७ नोव्हेंबरला फिल्टर प्लांटमधून विद्युत विभागात व नंतर मेकॅनिकल विभागात बदली करण्यात आली.
या बदलीबाबत मुख्य महाप्रबंधकांना किशोरीकांत यांनी जाब विचारला असता तुम्ही खालच्या जातीचे आहात. तुमच्या हाताचे पाणी कोण पिणार, असे म्हणत त्यांची अवहेलना केली. २४ नोव्हेंबरला पुन्हा त्यांची पातरखेडा येथे बदली केली. घडलेल्या या प्रकारामुळे दुखावल्याने किशोरीकांत चौधरी यांनी माजरी पोलिसात तक्रार दाखल केली.