राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांची निवड

52

🖋️ साहिल सैय्यद
घुग्गुस तालुका प्रतिनिधी
📱 9307948197

घुग्घुस : 7 डिसेंबर
बारामती पुणे येथे ५ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या सीबीएसई राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी चंद्रपूर चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये माउंट कर्मेल कॉन्व्हेन्ट सीनिअर सेकंडरी स्कूल, सिमेंटनगर घुग्घुस येथील आर्यश संजय उपाध्ये वर्ग १० वा व शौर्य विवेक बोढे वर्ग ८ वा तसेच श्री महर्षी विद्यामंदिर चंद्रपूर येथील हार्दिक राजेश सिंह वर्ग ७ वा आणि सानिया प्रवीण साकरकर वर्ग १२ वा यांची निवड झालेली आहे.
या स्पर्धेमधील विजयी खेळाडू येत्या १५ ते १८ डिसेंबर रोजी दिल्ली येथील आयोजित एसजीएफआय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सीबीएसईचे नेतृत्व करण्याचा मान मिळवतील. सदर विद्यार्थी फिटटूफाईट्स मार्शल आर्ट्स अँड फिटनेस सेंटर चंद्रपूर येथे सराव करत असून जुंसेई शोतोकान कराटे असोसिएशनचे सदस्य आहेत.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य सिस्टर लीना व प्राचार्य श्रीलक्ष्मी मूर्ती मॅडम आणि आपल्या पालकांना दिले. चमू प्रशिक्षक म्हणून मंजीत अजित मंडल मार्गदर्शन करीत आहे. जुंसेई शोतोकान कराटे असोसिएशनचे पदाधिकारी विनय बोढे, संजय कोल्हे, अविनाश बोंडे, मुहाफिझ सिद्दिकी, इमरान खान, जीतू साकपेल्लीवार यांचे विजयी खेळाडूंना मोठ्या स्तरावर जाण्यासाठी मार्गदर्शन लाभले आहे.