प्रतिमा ठाकूर यांची शिवसेना महिला सेना जिल्हाप्रमुख पदी निवड
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 7 डिसेंबर
शिवसेना शिंदे गटाच्या व पक्षाच्या महिला कार्यकर्त्या प्रतिमा ठाकूर यांची नुकतीच शिवसेना शिंदे गटाच्या शिवसेना महीला सेनेच्या जिल्हा प्रमुखपदी निवड झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
शिवसेना नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पूर्व विदर्भ प्रमुख किरण पांडव यांच्या नेतृत्वात प्रतिमा ठाकूर यांची चंद्रपूर शिवसेना महिला सेनेच्या जिल्हा प्रमूख पदी निवड करण्यात आली आहे.
प्रतिमा ठाकूर यांनी काही महिन्यांपूर्वीच मनसे पक्षाला जय महाराष्ट्र करीत मुख्यमंत्री शिंदे गटाच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला होता. याची पक्ष वरिष्ठ नेत्यांकडून दखल घेत नुकतीच त्यांची शिवसेना पक्षाच्या महिला सेना जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली असून शिवसेना पक्षाच्या वतीने निवडीचे लेखी पत्र देण्यात आले.
प्रतिमा ठाकूर यांची चंद्रपूर, राजुरा व ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रासाठी निवड करण्यात आली आहे.
यावेळी त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन आपण पक्षासाठी काम करणार असल्याचे सांगितले.
” शिवसेना पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून महिला सेना जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. ती आपण प्रामाणिकपणे पार पाडणार असून येत्या काळात महिलांचे संघटन करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी प्रतिमा ठाकूर यांनी सांगितले.