डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
🖋️मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 7 डिसेंबर
बौध्द समाज मंडळ राष्ट्रवादीनगर – तुळशीनगर तर्फे बोधीसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनी सर्व धम्म बांधव – धम्म भगीनी यांच्या वतीने धम्मकिर्ती बुद्ध विहार राष्ट्रवादीनगर चंद्रपूर येथे आयोजित ” श्रद्धांजली/ अभिवादन कार्यक्रमात श्रद्धा सुमनांनी अभिवादन करण्यात आले..
बौध्द समाज मंडळ चे कार्यशील युवा अध्यक्ष आयु. राकेश रामटेके यांच्या हस्ते सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच वॉर्डातील धम्म युवक विवेक कांबळे , अमित ढोले, दिलखुश भडके, जितु वाकडे , राहुल पेटकर , विनीत डूबडूबे , अनिल देवगडे सर आणि धम्म भगीणी आयुष्यमती कल्पना नीमगडे , मीरा पाटील , लीला रामटेके , माया ठेमस्कर , कुंदा मेश्राम , आम्रपाली ढोले , ब्राम्हने ताई , निरंजने ताई , अमृता ताई , साव ताई , हिंमतलाल भडके इत्यादींनी श्रद्धा सुमन अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक उध्दव ठेमस्कर यांनी केले तर विवेक कांबळे यांनी आभार मानले.
याप्रसंगी अनिल देवगडे सर आणि उध्दव ठेमस्कर सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अभिवादन कार्यक्रमास बहुसंख्य उपासक – उपासिका उपस्थीत होते.