चंद्रपूर मतदार संघाच्या विकासकामांना गती मिळणार – आमदार किशोर जोरगेवार • चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी 43 कोटी रुपयांचा निधी प्राप्त • 12 कोटी रु. होणार ताडाळी- येरुर- पांढरकवडा – धानोरा मार्गाचा विकास

51
चंद्रपूर मतदार संघाच्या विकासकामांना गती मिळणार - आमदार किशोर जोरगेवार • चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी 43 कोटी रुपयांचा निधी प्राप्त • 12 कोटी रु. होणार ताडाळी- येरुर- पांढरकवडा - धानोरा मार्गाचा विकास

चंद्रपूर मतदार संघाच्या विकासकामांना गती मिळणार – आमदार किशोर जोरगेवार

चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी 43 कोटी रुपयांचा निधी प्राप्त
• 12 कोटी रु. होणार ताडाळी- येरुर- पांढरकवडा – धानोरा मार्गाचा विकास

चंद्रपूर मतदार संघाच्या विकासकामांना गती मिळणार - आमदार किशोर जोरगेवार • चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी 43 कोटी रुपयांचा निधी प्राप्त • 12 कोटी रु. होणार ताडाळी- येरुर- पांढरकवडा - धानोरा मार्गाचा विकास

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 7 डिसेंबर
नागपूर येथे गुरुवार,7 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी यादीत चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी 43 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीतील 12 कोटी रुपये ताडाळी- येरुर- पांढरकवडा-धानोरा मार्गाच्या विकासासाठी खर्च केल्या जाणार आहे.
पुढील पंधरा दिवस हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवशेनात चंद्रपूर मतदार संघातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याच्या दिशने आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न असणार आहे. या अधिवेशनात मतदार संघातील विविध विषंयाकडे सभागृहाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न असणार आहे.
दरम्यान अधिवशेनाच्या पहिल्या दिवशी प्रकाशित आलेल्या पुरवणी यादीत चंद्रपूर मतदार संघातील विविध विकासकामांसाठी 43 कोटी रुपये देण्यात आले आहे. या निधीतील 12 कोटी रुपये ताडाळी- येरुर- पांढरकवडा- धानोरा मार्गाचा विकासकामासाठी खर्च केल्या जाणार आहे. साखरवाही – येरुर – वांढरी एमआयडीसी – दाताळा – चंद्रपूर या मार्गाचे सिमेंट काँक्रीट चौपदरीकरण करण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर याच मार्गाच्या सौंदर्यीकरणासाठी 10 कोटी रुपयांचा निधी पुरवणी यादीत मंजुर करण्यात आला आहे.
बंगाली कॅंम्प चौक ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मार्गावर नाली आणि पेविंग ब्लॉक कामासाठी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. म्हातारदेवी ते वढा दरम्यान लहान पुलाच्या बांधकामासाठी दोन कोटी 12 लक्ष रुपयांचा निधी या पूरवणी यादीत मंजूर करण्यात आला आहे. तर पुर्वी मंजूर असलेल्या कामासाठी 1 कोटी २५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून मतदार संघाच्या विकासकामांना गती मिळणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.