महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग येथे साजरा
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अलिबाग येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करून विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अधिष्ठाता डॉ.पुर्वा पाटील यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष, बार कौन्सिल अलिबाग – अॅड. प्रसाद पाटील, तसेच योगेश मगर – अध्यक्ष, सहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था अलिबाग हे उपस्थित होते.
अॅड. प्रसाद पाटील यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांना मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्ये, संविधानिक मूल्ये, नागरिकांच्या जबाबदाऱ्या तसेच आरोग्य क्षेत्रातील नैतिकता या विषयांवर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक जाणीव, सामाजिक बांधिलकी आणि मूल्याधिष्ठित नागरिकत्वाची भावना दृढ झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्टुडंट कौन्सिलसह सर्व विभागांचे मोलाचे सहकार्य लाभले.
डॉ.सुधाकर बंटेवाड, डॉ. विशाल उबाळे, डॉ.पवन शिरसागर, डॉ.करण वाघमारे, डॉ.रजत खानवलकर, तसेच AO डहाके व गावंड यांचे विशेष योगदान लाभले कार्यक्रमाची सांगता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, मानवतावादी आणि संविधानिक कार्याच्या वारशाला स्मरून, विद्यार्थ्यांनी मूल्यनिष्ठ व जबाबदार नागरिक राहण्याची प्रतिज्ञा करून करण्यात आली.
समाजभान, संविधानभान आणि कर्तव्यभान यांची नवचैतन्याने रुजलेली प्रेरणा या कार्यक्रमातून सर्वांना लाभली.









