अमरावती वरूड  चौघांची मोठी फसवणूक.

अमरावती :- घर व प्लॉट खरेदीची बतावणी करून येथील तिघांची तब्बल 28 लाख 43 हजार रुपयांनी आर्थिक फसवणूक करण्यात आली. श्री. काठीवाले यांची आई आणि दोन बहिणी यांना घर खरेदी करण्याचे कारण सांगून तिघींजवळून 19 लाख 53 हजार रुपये किंमतीचे 65 तोळे सोन्याचे दागिने घेतले.  महेंद्र गंगाधर काठीवाले वय 35, रा. वरुड यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी आरोपी कल्पना मनोहर श्रीराव, दीपक शिवनारायण बटवडा व प्रवीण धरमठोक तिघेही रा.वरूड यांचेविरूद्ध भादंविचे कलम 406, 420, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तिघेही आरोपी पसार झाले आहेत. गुन्ह्याची माहिती होताच आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अमरावती येथील न्यायालयात धाव घेतली आहे.

याव्यतिरिक्त सुजित मारोतराव खेर्डे वय 47, विकास टेमघरे वय 48 व योगेश विष्णुपंत गणोरकर वय 47 या तिघांना प्लॉट विक्री करण्याचे कारण सांगून त्यांच्याकडून एकूण 8 लाख 90 हजार रुपये घेतले. चौघांकडून 28 लाख 43 हजारांचा ऐवज हडपून फसवणूक केल्याचा आरोप आहे. नमूद तिघांनी संबंधितांकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी अनेकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

डॉ. जयंत पंडित काशीकर वय 40, रेणुकानगर, वरुड यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्यांच्या ओळखीतील अनेकांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. ज्यांनी फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारली त्यापैकी अनेकांना तोतयाने विविध कारणे सांगून पैशाची मागणी केली. डॉ. काशीकर यांचे मित्र पंकज मनोहर जावळे यांनी तोतयाची फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारून त्याला पाच हजार रुपये ऑनलाइन पाठविले. आपल्या नावाचा गैरवापर करीत असल्याचे उघडकीस येताच डॉ. काशीकर यांनी पोलिसांत तक्रार केली. वरुड पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here