येरवड्यातून पॅरोलवर सुटलेल्या अट्टल गुन्हेगाराकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग.
पुणे:- येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्या एका सराईत गुन्हेगारांना 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कदमवाक वस्ती येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.
सचिन सुभाष कदम वय 45 असे या सराईत गुन्हेगार याचे नाव आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर सचिन कदम याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी घरात एकटीच होती. यावेळी आरोपीने घरात प्रवेश करत तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर आरोपीने तिचे तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी दिली. तरीही पीडित मुलीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने घराबाहेर पळ काढला.
दरम्यान, आरोपी निघून गेल्याची खात्री पडताच पीडित मुलीने आपल्या कुटुंबीयांना फोन करून घटनेची माहिती दिली. कुटुंबीयांनीही तातडीने लोणी काळभोर पोलीस स्टेशन काढतात सचिन कदम यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर करीत आहेत.