गिरगांव जि.प.प्राथमिक शाळेत सावरगाव केंद्राची द्वितीय शिक्षण परिषद संगणक कक्षाचे उद्घाटन; केंद्राअंतर्गत उपक्रमाचे सादरीकरण

गिरगांव जि.प.प्राथमिक शाळेत सावरगाव केंद्राची द्वितीय शिक्षण परिषद

संगणक कक्षाचे उद्घाटन; केंद्राअंतर्गत उपक्रमाचे सादरीकरण

गिरगांव जि.प.प्राथमिक शाळेत सावरगाव केंद्राची द्वितीय शिक्षण परिषद संगणक कक्षाचे उद्घाटन; केंद्राअंतर्गत उपक्रमाचे सादरीकरण

राजेश बारसागडे
तळोधी (बा.)अप्पर तालुका प्रतिनिधी
8830961332

तळोधी (बा.) :- नागभीड तालुक्यातील सावरगाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेची दुसरी शिक्षण परिषद जि.प.उच्च प्राथ शाळा, गिरगाव येथे पार पडली. याप्रसंगी पंचायत समिती नागभीडचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट, सरपंच प्रशांत गायकवाड सरपंच गिरगाव यांची उपस्थिती होती.शिक्षण परिषदची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.गिरगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापक पदावरून सेवा निवृत्त झालेले उद्धव मांढरे यांचेकडून शाळेला संगणक कक्षा करिता आर्थिक मदत प्राप्त झाली. दरम्यान से. नि. मुख्याध्यापक उद्धव मांढरे गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट
यांच्या हस्ते संगणक कक्ष व खेळाडू कक्ष यांचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती माया कामडी,सहाय्यक शिक्षक घोरुडे, लोनबले,सोनवणे, प्रभा कामडी, विलास सहारे, राहुल पोशट्टीवार,उत्तम बनसोड जगजीवन राऊत,माधव बोरकर, कुमारी बाली मडावी, कुमारी छाया विंचुरकर यांची उपस्थिती होती.याप्रसंगी उदघाट्नीय भाषणात बोलताना प्रमोद नाट म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्वानी प्रयत्न करावा.अध्ययन स्तरनिहाय विद्यार्थ्यांचा कृती आराखडा तयार करून मार्गदर्शन करावे. मिशन गरुडझेप, शिक्षणदान उपक्रम तसेच लसीकरण व स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख योगेश भगत यांनी केंद्रस्तरिय अध्ययन स्तर डाटा विश्लेषण केले. त्याप्रमाणे गोष्टीचा शनिवार,शिष्यवृत्ती नवोदय परीक्षा, लसीकरण इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तर विषयतज्ज्ञ बि आर सी यांनी स्वाध्याय,नालंदा, गरुडझेप, स्काॅलरशीप, नवोदय, सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती व इतर विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी केंद्राअंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले, यामध्ये झाडबोरी शाळेत चालणारा “आनंदी वाचन ” हा उपक्रम किशोर पराते यांनी सादर केला.
अश्या प्रकारे आनंददायी वातावरणात केंद्रातिल सर्व शिक्षकांच्या व उ.श्रे.मु.अ.यांच्या सहकार्याने शिक्षण परिषदेची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here