ऊश्राळ मेंढा ग्रामपंचायत तर्फे अंगणवाडीचे लोकार्पण

ऊश्राळ मेंढा ग्रामपंचायत तर्फे अंगणवाडीचे लोकार्पण

ऊश्राळ मेंढा ग्रामपंचायत तर्फे अंगणवाडीचे लोकार्पण

राजेश बारसागडे
तळोधी (बा.)अप्पर तालुका प्रतिनिधी
8830961332

तळोधी (बा.):- नागभीड तालुक्यातील ऊश्राळ मेंढा येथील ग्रामपंचायततर्फे अंगणवाडी क्रमांक 2 चा लोकार्पण सोहळा शुक्रवारी पार पडला.
या कार्यक्रमाचे उदघाट्न जिल्हा परिषद सदस्य नयना गेडाम यांच्या झाले.अध्यक्षस्थानी नागभीड पंचायत समितीचे सभापती प्रफुल खापर्डे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद चंद्रपूरचे गटनेता डॉ. सतीश वारजूकर,जि. प. सदस्य खोजराम मरस्कोल्हे, सरपंच सेवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा ऊश्राळ मेंढाचे सरपंच हेमराज लांजेवार,गंगासागर हेटीचे लोकनियुक्त सरपंच दिलीप गायकवाड,येनोलीचे लोकनियुक्त सरपंच अमोल बावनकर, चिखलगावचे सरपंच सीताराम मडावी,वाढोण्याचे सरपंच देवेंद्र गेडाम,देवानंद डोर्लीकर,रामदास तोडासे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन ग्रामसेवक वाय.पी.कापगते यांनी केले. प्रास्ताविक लोकनियुक्त सरपंच हेमंत लांजेवार यांनी केले. दरम्यान त्यांनी आपल्या भाषणात ऊश्राळ मेंढा गावाच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचा मनोदय व्यक्त केला.आभार मुख्याध्यापक शिवणकर यांनी मानले.अंगणवाडीचे लोकार्पण झाल्याने पालकांमध्ये व नागरिकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here