सावधान, सेक्सटार्शनचे बळी जात आहेत!

अंकुश शिंगाडे

मो: ९३७३३५९४५०

सावधान ; सेक्सटार्शनचे बळी जात आहेत. असा विषय मांडला तर लोकांना खरंच आश्चर्य वाटेल. आश्चर्य या गोष्टीचं की नेमकं सेक्सटार्शन लोकांना समजलं नाही म्हणून आश्चर्य. तसंच दुसरं आश्चर्य म्हणजे सेक्सटार्शनचा ज्याला अर्थ समजला, तो विचार करीत असतो की अमुक व्यक्ती जो सेक्सटार्शनचा शिकार झाला. तो स्वतः त्याचा शिकार झाला असून त्याला कोणी शिकार केलं आहे. हे समाज मानत नाही. समाजाला याचंही आश्चर्य वाटतं.

सेक्सटार्शन……..नेमकं काय आहे सेक्सटार्शन. त्याचा अर्थ असा की व्हीडीओ कॉल करुन समोरुन कोणीतरी महिला किंवा पुरुष बोलते. त्यानंतर त्या व्यक्तीशी जी व्यक्ती बोलते. ती व्हीडीओ कॉलवर अश्लील बोलते. अश्लील वागते आणि अश्लील कृत्यही करते. अश्लील कृत्य करूनही घेते. त्याचं रेकॉर्डही करते. त्यानंतर ती व्यक्ती ते केलेलं रेकॉर्डींग त्या व्यक्तीला पाठवून धमकी देते आणि धमकीत म्हणते की तू मला एवढे एवढे पैसे दे. नाहीतर मी हा व्हिडिओ पोलिसात देईल.

ही भीती दाखवताच माणूस घाबरतो व त्यानंतरत्या भीतीनं आपली बदनामी होईल असे वाटून आपण त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीनं जेवढे पैसे मागीतले तेवढे देतो. हेच ते सेक्सटार्शन.

अलीकडे सेक्सटार्शनचा हा प्रकार जोर पकडत आहे. अशी एक टोळी सक्रीय आहे की जी अशा प्रकारचं कृत्य करीत आहे. त्या टोळीचे काही सदस्य एखाद्याला फोन करतात. त्यानंतर त्या फोनवर जर पुरुष बोलत असला की तो फोन स्रीकडे हस्तांतरीत केला जातो. मग अश्लील संभाषण सुरु होतं. त्यानंतर बरंच काही. मग धमक्या. धमकीत तोतया पोलीसही फोन करतो. तो धमक्या देत म्हणतो की तुमची अमूक अमूक प्रकारची केस अमूक अमूक ठिकाणी आली असून तिचा निपटारा जर करायचा असेल, तर एवढे पैसे द्यायला हवे. मग अशी भीती त्या तोतया पोलिसांनी दाखविल्यास फालतूची कटकट मागे लागेल व समाजात बदनामी होईल, या भीतीन त्याा व्यक्तीनं जेवढे पैसे म्हटले तेवढे पैसे ब-याच जणांनी आतापर्यंत पाठवले आहेत.पैसे गेले आहेत व ते लोकं फसले आहेत. यात बरेच जण अनभिज्ञ आहेत. कारण असा प्रकार ब-याच जणांना अजूनही माहीत नाही. 

 अश्लील गोष्टी. आज बरेच जण या गोष्टीत आंबटशौकीन आहेत. कधी कधी हा प्रकार सेक्सटार्शनसारखा जिवावर बेततो. तरी लोकं सुधारत नाहीत यापासून किंवा साधा बोधंही घेत नाहीत. तरी समाज शिकला सवरला आहे.

या सेक्सटार्शनमध्ये केवळ अडाणी फसतो असा नाही तर बरीच सुशिक्षीत माणसं फसतात. जी शिकली आहेत. उच्च शिक्षण शिकली आहेत. एक प्रकारे अडाणी परवडले की जे अशा प्रकाराला बळी पडत नाहीत. कारण ते असे बळी पडण्यापुुर्वी दहावेळा विचारपूस करतात. शहानिशा करतात. मगच हात टाकतात अशा प्रकारात. त्यात जर फायदा असेल तरच ते हात टाकतात असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.

पुर्वी असेच लोकांना लुबाडण्याचे प्रकार झाले. फोन यायचे. त्यानंतर विचारलं जायचं की अमूक कामासाठी तुमच्या पतीनं ओटीपी मागितलाय. तो सांगा किंवा तुमचा आधार अपडेट करायचाय. ओटीपी सांगा. मग ओटीपी सांगीतला की बस एका मिनीटात आपले पैसे गायब व येणारा मोबाईल नंबरही गायब. पैसे कुठे गेले हे कळायला मार्ग नव्हता. आता ही गोष्ट ब-याच जणांना माहीत झाली व लोकं सावधान झाले. आता अशा प्रकारचा ओटीपी कोणी देत नसल्यानं अशा सक्रीय टोळीनं पैसे कमविण्यासाठी नवीन मार्ग शोधलाय. त्यालाच सेक्सटार्शन असं नाव देता येईल. 

 एक प्रसंग सांगतो. महाराष्ट्रातच घडलेला प्रसंग. असाच एका व्यक्तीला एक फोन आला. त्यानंतर त्यानं त्या व्यक्तीला पन्नास हजार दिले. त्यानंतर ती गोष्ट त्यानं आपल्या पोलीस असलेल्या मित्राला सांगीतली. दुस-या दिवशी त्या पोलीस असलेल्या मित्रानं ती तक्रार ऑनलाईन दाखल झाली असं सांगून ती आपल्याच पोलीसस्टेशनला आहे असं सांगीतलं व ती केस निपटवून देतो असं बोलून त्या आपल्याच मित्राकडून पुन्हा पन्नास हजार रुपये घेतले. असा एकुण एक लाखाचा चुना लागला.

अलीकडे कोणीही कोणाला मोबाईलवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो. त्यानंतर हळूहळू तो बोलायला लागतो. मग अश्लीलतेचं संभाषण सुरु होतं. स्क्रीन रेकॉर्ड वैगेरे सर्वकाही. काही मुली तर अशा असतात की अशा फेसबुकवर त्या मैत्री तर करतात. व्यतिरीक्त बोलणा-यांना बोलण्यासाठी मोबाईलवर रिचार्जही मारुन मागतात. तसेच घरखर्चासाठीही पैसेही मागतात. काही मुली मात्र यू ट्यूब चैनल सबक्राईब करा असे म्हणून यू ट्यूबवरुन पैसेही कमवू पाहतात. 

पैसे उकळण्याचे हे नवनवीन प्रकार. आपण साधे भोळे. आपल्याला या प्रकाराची कल्पना नसते व आपण फसत जातो. त्यानंतर आपल्यावर अशी मंडळी दबाव टाकत जातात व नाईलाजानं शेवटी बदनामीच्या धाकानं आपण आपल्याजवळ पैसे नसल्यास आत्महत्याही करतो. हे तेवढंच खरं आहे.

सेक्सटार्शनपासून वाचण्याचे उपाय

 सेक्सटार्शनपासून वाचण्याचे अनेक उपाय आहेत. त्यापैकी महत्वाचे उपाय खालीलप्रमाणे सांगता येतील.

            १) कोणीही अनोळखी नंबर उचलू नये. त्यावर जास्त बोलू नये. 

           २) फेसबुकवर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करु नये.

            ३) कोणाशीही फोनवर तरी अश्लील बोलणं बोलू नये.

            ४) समजा चुकून असं काही घडलंच तर न घाबरता, शांत राहून त्यावर कोणाला विचारुन मार्ग काढावा. शक्यतोवर जवळच्या पोलीस स्टेशनला त्याची न घाबरता तक्रार करावी.

          ५) महत्वाचं म्हणजे समोरील व्यक्ती कितीही ओळखीची असली तरी त्याचे म्हणण्यानुसार आपण तसे कृत्य वा निर्णय मोबाईलवर तरी करु नये. आपण स्वतः विचार करुन योग्य निर्णय घ्यावा. कोणाच्या मतानुसार वागू नये. आपण स्वतः निर्णय घ्यायला सक्षम असावे.

वरीलप्रकारे पंचसुत्री वापरली की आपण कोणाच्या जाळ्यात त्यानं कितीही ओढलं तरी फसत नाही आणि कोणीही फसू नये. सर्वांनी सावधान व्हावे. कारण आता जग हे धोका देणारं बनलं आहे. या काळात लोकं प्रसंगी कामं करीत नाहीत. कंटाळा करतात. तसेच कमी श्रमात जास्त पैसा कमवायला पाहतात. असाच जास्त पैसा कमविण्याचा एक प्रकार म्हणून अलीकडे सेक्सटार्शन हा प्रकार आला आहे. ह्या प्रकारालाही कोणी घाबरुन जावू नये. प्रतिकार करावे. शक्यतोवर चर्चा करावी. मित्रावर विश्वास ठेवू नये. तसेच शक्य झाल्यास पोलीस स्टेशनचा रस्ता पकडावा म्हणजे झालं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here