शेगावला निघालेल्या वारीला गंगुबाई (अम्मा) जोरगेवार यांनी दाखवली हिरवी झेंडी

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351 

दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री. गजानन महाराज सेवा संस्थेच्या वतीने शेगाव वारीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान आज या वारीला चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली मंदिर येथुन सुरुवात झाली. गजानन मंदिर येथुन ही वारी माता महाकाली मंदिर येथे पोहचली. यावेळी येथे वारीचे स्वागत करण्यात आले. आमदार किशोर जोरगेवार यांनी शुभेच्छा दिल्या. माता महाकालीचे दर्शन घेऊन वारी शेगावच्या दिशेने निघाली.

तत्पूर्वी या वारीला गंगुबाई जोरगेवार यांनी हिरवी झेंडी दाखविली हि वारी चंद्रपूर, कळंब, माहुर, वाशिम होत शेगाव येथे पोहचणार आहे. या वारीत शेकडो वारकरींनी सहभाग घेतला. यावेळी माता महाकाली मंदिर ट्रस्टी सुनील महाकाले, श्री गजानन महाराज सेवा संस्थेचे गजानन देशमुख, बब्बू भुल्लर, बबन कृषपल्लीवार, श्रीकांत अंजिकर, राकेश खाडिलकर, भिवसन गौरकार, बंडुभाऊ रायपूरे, लोकचंद कापगते, जनार्दन उमे, बादल रायपुरे, मुरलीधर घुमे, प्रतिभा प्रमोद धुमने, कमलाताई अलोने, जगदीश वाघमारे, निकिता देशमुख, विजयालक्ष्मीबाई बंटूछाया सैनी आदिंची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here