सामाजिक जाणिवेतून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

52

सामाजिक जाणिवेतून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

पूनम पाटगावे

जोगेश्वरी प्रतिनिधी

मो. नं. ८१४९७३४३८५

जोगेश्वरी :- जोगेश्वरी विधानसभा क्षेत्र शिवसेना आमदार /मा. राज्यमंत्री /परभणी जिल्हा संपर्क प्रमुख मा. श्री. रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. ७ जानेवारी २०२३ रोजी शिल्पग्राम उद्यान, पूनम नगर, जोगेश्वरी पूर्व येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला.

या कार्यक्रमप्रसंगी अनेक वृक्षप्रेमीनी वृक्षारोपण करण्याचा आनंद लुटला. मनुष्य हा वृक्ष आणि निसर्गाच्या सानिध्यात कसा रमून जातो, हे या कार्यक्रमातून पहावयास मिळाले. सदर कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक जाणीवेतून केले असल्याने शिवसैनिकांबरोबरच, वृक्षप्रेमी, अनेक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते देखील वृक्षारोपणाचा आनंद घेत होते.

सदर वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी मा. श्री. रवींद्र वायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसैनिक, वृक्षप्रेमी, सामाजिक संस्थानीही वृक्षारोपण करत निसर्गाचे महत्व दाखवून दिले. वृक्षारोपण कार्यक्रमानंतर आमदार वायकर यांनी वृक्षप्रेमीसाठी हुरडा पार्टी आणि चहापान देखील आयोजित केला.