चांदोरे बौद्धवाडी येथील बुद्धविहारात आरोग्य शिबीर संपन्न.
नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048
माणगांव : -मानव अधिकार एवं सामाजिक न्याय संघटन यांच्या सौजन्याने मानव अधिकार तालुका अध्यक्ष बाळाराम तांबे, चांदोरे विभागीय अध्यक्ष नंदकुमार चांदोरकर, विभागीय उपाध्यक्ष/ग्रामपंचायत सदस्य गणेश दिवेकर यांच्या प्रयत्नाने दि. ०७/०१/२०२४ रोजी चांदोरे बौद्धवाडी सलग्न रोहिदास वाडी येथे आरोग्य शिबिर हेल्थी हॅप्पी कम्युनिटीच्या सुपर वायजर वैभवी विजेंद्र मानकर मॅडम, अब्दुस जुवले सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. “आजच्या धकाधकीच्या जीवनशैली मधे आपले आरोग्य उत्तम ठेवून ते आपण कसे मेन्टेन करू शकतो, तसेच आपल्या सवयी आपले आरोग्य घडवू किंवा बिघडवू शकतात, हे मानकर मॅडम यांनी निदर्शनास आणून दिले” चांदोरे बौद्धवाडी व रोहिदास वाडीतील लोकांनी या शिबिरास अगदी बहु संख्येने प्रतिसाद दिला.
या शिबिरास दोन्ही वाडीतील अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्या लोखंडे मॅडम तसेच गावातील सर्व नागरिक व महिलां उपस्थित होत्या.