माजी आमदार भाईसाहेब सावंत यांच्या पुण्यतिथी निमित जे.बी.सावंत हायस्कूल लोणेरे येथील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप
✒️नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞8983248048
माणगांव : -जे.बी सावंत हायस्कूल लोणेरे येथे माजी आमदार भाईसाहेब सावंत यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सुरवातीला महापुरुषांचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. नंतर उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले नंतर जे.बी सावंत हायस्कूल मधील सर्व मुलांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव नानासाहेब सावंत ,भाऊसाहेब सावंत रोटरी क्लब ऑफ मुंबई गोरेगाव वेस्ट चे अध्यक्ष ,भावेश शहा,माजी अध्यक्ष संदिप सावंत ,लोणेरे सरपंच प्रकाश टेंबे,मांगरूळ सरपंच वारिक मॅडम, पहले सरपंच करिष्मा मांजरे, पन्हळघर खुर्द सरपंच हारिदास शेडगे, न्हावे सरपंच तुकाराम शेपुंडे, पन्हळघर बुद्रुक माजी उपसरपंच तथा पत्रकार राम भोस्तेकर तसेच जे.बि सावंत हायस्कूल व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष, व सर्व सदस्या तसेच विद्याथी पालकवर्ग व विद्याथी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करुन यापुढेही जास्तीत जास्त शाळा प्रगती पथकाकडे वाटचाल करत असून उत्तम दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार असल्याचे सांगितले
सर्व मुलांना मोफत गणवेश मा.नितीनजी सावंत सदस्य पन्हळघर परीसर शिक्षण मंडळ लोणेरे यांनी दिले आणि सुसज्ज अशी प्रयोगशाळा हि थोड्या दिवसात उपलब्ध करणार असल्याचे सांगितले. त्यांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनाच्या यांनी आभार व्यक्त केले.तर नितीन सावंत आणि पन्हळघर परिसर शिक्षण मंडळ लोणेरे यांचे माणगांव तालुक्यातील अनेकांकडून कौतुक होत आहे.