विभागीय लोकशाही दिनात 25 प्रकरणांवर चर्चा प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करा:विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

विभागीय लोकशाही दिनात 25 प्रकरणांवर चर्चा

प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करा:विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

विभागीय लोकशाही दिनात 25 प्रकरणांवर चर्चा प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करा:विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

✒️ सुमित देशमुख ✒️
अमरावती उपजिल्हा प्रतिनीधी ग्रामीण
📱9022532630

अमरावती, दि. 08 : नागरिकांकडून प्राप्त तक्रार अर्जांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही करण्यात यावी. प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करुन केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधित तक्रारदारांना पत्राव्दारे कळविण्यात यावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी संबंधित विभागांना आज येथे दिले.

विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आज ‍लोकशाही दिन व महिला लोकशाही दिनाचे कामकाज पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपायुक्त (पुरवठा) आर.एस. आडे, उपायुक्त (विकास) आर.ए. फडके, एस. व्ही. कावळे, महिला व बालविकास उपायुक्त यवतमाळचे उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाडआदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद पेढेकर यांच्यासह महसूल, पोलीस, कृषी, महापालिका, सहकार, महिला व बालविकास, समाजकल्याण व ऊर्जा विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

लोकशाही दिनात स्वीकृत, अस्वीकृत व सामान्य तक्रार अर्ज अशा एकूण 25 प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी तक्रारदारांचे म्हणने ऐकुण घेतले. तसेच प्रकरणांच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिल्या. महिला लोकशाही दिनात एकही प्रकरण दाखल नसल्याचे महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी श्रीमती वऱ्हाडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here