कर्जत येथे लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची उपस्थिती….

कर्जत येथे लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची उपस्थिती....

कर्जत येथे लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची उपस्थिती….

कर्जत येथे लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची उपस्थिती....

✒️संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333

कर्जत : – दिनांक ०७ जानेवारी २०२४ रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून व कर्जत नगरपरिषदेच्या माध्यमातून साकारलेल्या भव्य दिव्य लोकार्पण व भूमिपूजन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यास वारकरी सांप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, महिला भगिनी, बैठकीतील श्री सदस्य, राजकीय, सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. हा सोहळा संपन्न होत असताना प्रथमतः महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण पार पडले. या प्रसंगी बैठकीतील श्री सदस्यांनी श्लोक बोलून या कार्यक्रमाची सुरुवात केली. तद्नंतर वारकरी सांप्रदायाच्या वतीने आयोजित केलेल्या दिंडी सोहळ्यात अनेक वारकरी “राम कृष्ण हरी” नामाच्या जयघोषामध्ये तल्लीन होत “प्रति आळंदी पंढरपूर” पर्यंत दिंडी सोहळ्यात सहभागी झाले. यानंतर विठ्ठलाच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा व भजनभूषण श्री. गजाननबुवा पाटील यांच्या स्मारकाचा भूमीपूजन सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात पार पडला. कर्जत मधील सर्व शासकीय कार्यालय एकाच इमारतीत आणून नागरिकांकरिता सोयीचे व्हावे यासाठी भव्य प्रशासकीय भवन बांधण्यात आले व त्याचाही उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

त्यानंतर माननीय मुख्यमंत्री यांचे सभास्थळी आगमन झाले. सभास्थळी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून वारकरी सांप्रदायातील अनेक संस्थांना धर्मशाळेकरिता देणगी स्वरुपातील चेक प्रमुख व्यक्तींकडे सुपूर्त करण्यात आले. या सभेदरम्यान प्रामुख्याने माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलेल्या कर्जत मधील श्री संतोष दगडे व लेफ्टनंट कमांडर आर्मी युनिट आणि स्पोर्ट्स शीतल कृष्णा गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत खालापूर मधील विविध समस्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या समोर निवेदन केले. यात प्रामुख्याने पेण को. ऑप. बँकेचा प्रश्न, कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या, कर्जत शहरातील वाढीव नळपाणीपुरवठा योजना, अत्यावश्यक सोई सुविधांसहीत १०० बेडचे हॉस्पिटल तयार करणे, कर्जत येथील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर भवन तयार करणे अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. या सर्व समस्येसंदर्भात व कर्जत खालापूरच्या विकासाकरिता आमदार महेंद्र थोरवे यांच्या सदैव पाठीशी आहे असे आश्वासन मा. मुख्यमंत्री यांनी त्यांच्या मनोगतातून दिले व बोलले “न भूतो न भविष्यती” असा ऐतिहासिक सोहळा संपन्न….

व्यासपीठावर खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार सदाभाऊ सरवणकर, ह.भ.प. दादा महाराज राणे, ह.भ.प. रामदास महाराज पाटील, ह.भ.प. हरिश्चंद्र महाराज जाधव, ह.भ.प. रामदास महाराज सावंत, ह.भ.प. भरत महाराज देशमुख, ह.भ.प. रामचंद्र महाराज पिंगळे, ह.भ.प. काशिनाथ महाराज वाघुळे, ह.भ.प. गुरुवर्य महादेव महाराज मांडे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज येरम, ह.भ.प. कृष्णा महाराज लांबे, ह.भ.प. बळीराम महाराज पवार, ह.भ.प. कैलास महाराज भोईर तसेच या सभेच्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.