जिल्ह्यातील खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगांव, महाड, नागोठणे, अलिबाग या ठिकाणी औद्योगिक क्षेत्राकरिता प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

जिल्ह्यातील खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगांव, महाड, नागोठणे, अलिबाग या ठिकाणी औद्योगिक क्षेत्राकरिता प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

जिल्ह्यातील खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगांव, महाड, नागोठणे, अलिबाग या ठिकाणी औद्योगिक क्षेत्राकरिता प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड:- रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगांव, महाड, नागोठणे, अलिबाग या ठिकाणी मोठया प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून औद्योगिक कंपन्यांमध्ये कामगार संघटनांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी अचानक संप व आंदोलन पुकारण्यात येत असतात. त्यामुळे अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. रायगड जिल्हयामध्ये बहुतांशी गावामध्ये हिंदु-मुस्लिम-बौद्ध तसेच इतर धर्मीयांची मिश्रवस्ती असल्याने अधून मधून वैयक्तिक कारणांमुळे पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये हिंदु-मुस्लिम व्यक्तींमध्ये दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे घडण्याची जातीय व धार्मीक घटना घडत असतात. त्यामुळे देखील हिंदू-मुस्लिम जातीय तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे.

या सर्व परिस्थिती लक्षात घेता औद्योगिक क्षेत्रात शांतता प्रस्थापित रहावी तसेच राजकीय परिस्थिती आंदोलन/उपोषण व आत्मदहनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. या दृष्टीकोनातून रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत दि.02 जानेवारी 2024 रोजी 00.01 वा. ते दि.16 जानेवारी 2024 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत या कालावधीकरीता मुंबई पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37(1) मधील (अ), (ब), (क), (ड), (ई) व (फ) प्रमाणे पुढील कृत्ये करण्यास या अधिसूचनेद्वारे अपर जिल्हादंडाधिकारी संदेश शिर्के यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, बंदूका, सुरे काठया किंवा लाठया अगर शारिरीक दुखापत करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही तत्सम वस्तू बाळगणे, अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्ती, प्रेत, आकृत्या यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा देणे किंवा गाणे म्हणणे किंवा वाजविणे, सभ्यता अगर निती याविरुध्द असतील अशी जिल्हयाची शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पाडण्याचा संभव आहे अशी आवेशपूर्ण भाषणे किंवा हावभाव करणे किंवा सॉग करण चित्र, चिन्हें अगर कोणतीही तत्सम वस्तु, जिन्नस तयार करणे किंवा लोकांत प्रसार करणे, रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत पूर्व परवानगीशिवाय पाच अगर पाचाहून अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास किंवा मिरवणूकीस मनाई राहील.तसेच सदर अधिसूचना वरिष्ठांच्या आदेशानुसार किंवा कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे, अशा शासकीय अधिकाऱ्यांना अशी हत्यारे योग्य रितीने बाळगण्यासाठी अगर ठेवून घेण्यासाठी लागू नाही.ही अधिसूचना ही खऱ्या प्रेत यात्रेसाठी, अंत्यविधीच्या जमावास अगर शासकीय समारंभासाठी लागू नाही. तथापि, या कालावधीत होणारे उत्सव, सभा, मिरवणूका इत्यादी कार्यक्रमास परवानगी देण्याचे अधिकार संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना देण्यात येत आहेत. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शांतता धोक्यात येणार नाही याची जबाबदारी आयोजकांवर राहील, या अटीवर परवानगी द्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here