मंत्रालयात ५व्या मजल्यावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या

55

मुंबई: मंत्रालयात पाचव्या मजल्यावरून एका तरुणाने उडी मारत आत्महत्या केली. हर्षल रावते असे या तरुणाचे नाव आहे. हर्षलला गंभीर अवस्थेत तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र काही वेळातच त्याला मृत घोषित केले.

हर्षलने आत्महत्या का केली, याबाबत अद्याप काहीही समजू शकलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार हर्षल हा ४४ वर्षीय तरूण मुंबईतील चेंबूरचा रहिवासी आहे. तो महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण या ठिकाणी नोकरी करीत असल्याचे त्याच्या ओळखपत्रावरून समजते. हर्षलच्या खिशामध्ये एक चिठ्ठीही सापडली असून, त्यामध्ये ‘माय न्यायाधीश’ अशा नावाने अर्ज लिहिला आहे. मंत्रालयाच्या ५व्या मजल्यावरून हर्षलने त्रिमूर्तीं प्रारंगणात उडी मारत आत्महत्या केली.