Election of favorite birds and snakes in Hinganghat taluka.
Election of favorite birds and snakes in Hinganghat taluka.

हिंगणघाट तालुक्यातील फेव्हरेट पक्षी व सर्पाची निवडणूक.

 Election of favorite birds and snakes in Hinganghat taluka.

मुकेश चौधरी प्रतीनिधी
हिंगणघाट:- तालुक्यात प्रथमच अनोख्या तालुका पक्षी व सर्पाची निवडणूक, निसर्गसाथी फाऊंडेशन मागील काही वर्षापासून पर्यावरण तथा निसर्गसंवर्धनार्थ कार्य करित असून. निसर्गचक्र सुरक्षित असेल तर पर्यावरणात शुद्धता राखता येईल. दिवसे दिवस पर्यावरणाचा -हास होत आहे . यावर आळा घालयचा असेल तर, निसर्गचक्रातील पशु, पक्षी आदिचे संरक्षण होने गरजेचे असल्याचे निसर्गसाथी फाऊंडेशन ने हेरुन, हिंगणघाट शहरासह तालुक्यातील पशु पक्षी ही सुरक्षित राहणासाठी तालुका पक्षी व सर्प डिजीटल निवडणूकीचे आयोजन 11 ते 15 फेब्रुवारी 2021 दरम्यान केले आहे. यात तालुक्यातील सर्व नागरीकांचा समावेश असणार आहे. राज्यात काही मोजक्याच जिल्हात शहर पक्षी निवडले गेले असले तरी, हिंगणघाट तालुक्यात पहील्यांदाच तालुका पक्षी निवडला जाणार असुन देशासह राज्यात कोठेही तालुका सर्प आजतागायत निवडला गेला नाही. मात्र निसर्गसाथी फाऊंडेशनचा पुढाकाराने राज्यात पहिल्यांदाच तालुका सर्प निवडला जाणार आहे. अशी राहील निवडणूक मोबाईल वर https : //forms.glelJuBUBhkRsakH5sxMB ही लिंक दिनांक 11 फेब्रुवारी गुरुवार सकाळी 7 वाजेपासुन दिनांक 15 फेब्रुवारी सोमवार सायं 5 वाजे पर्यंत नागरिकांना उपलब्ध राहील. यात ठिपक्यांचा पिगळा, कोतवात, चिमणी, शिक्रा, कावळा, गायबगळा या सहा पक्षी उमेदवारांचा तर अजगर, धामण, घोड्या, तस्कर, कवड्या अशा पाच सर्प उमेदवाराचा समावेश आहे . नागरिकांना पाठविण्यात येणान्या लिंक सोबत पाठविलेल्या PDF मध्ये या सर्व पक्षी व सर्प उमेदवारांची थोडक्यात माहिती दिली आहे याचे अवलोकन करुन नागरिकांना आपला आवडता पक्षी, सर्प निवडण्याचे आवाहन निसर्गसाथी फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रविण कडू, डॉ.बालाजी राजुरकर, प्रभाकर कोळसे, अनिल कानकाटे, राकेश झाडे, नियाजुद्दीन सिद्दीकी, परिक्षित ढगे, प्रा.अश्विनी ठेकरे, राजश्री वितळकर, प्रा.सुलभा कडू, गुणवंत ठाकरे, रुपेश लाजुरकर, प्रा.जितेंद्र केदार, आशिष भोयर, ज्ञानेश्वर चौधरी, अभिजीत डाखोरे, दामोदर बंडावार, मनोज बोकडे, दहापुते, परिमल शेंडे, नितिन सिंगरु, निखिल दकील, संदिप पोटरकर, सतिश नक्षिने, गोपाल मांडवकर, सुजल लोहकरे, प्रविण घरडे आणि निसर्गसाथी फाऊंडेशने केले आहे . निसर्गसाथी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित तालुका पक्षी, सर्प निवडणूकीकरिता नगरपालिका हिंगणघाट, पंचायत समिती हिंगणघाट, कृषि उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट, वर्धा वन विभाग यांनी सहकार्य दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here