हिंगणघाट पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान सर्व शक्ती केंद्र प्रमुख तसेच बूथ प्रमुख आढावा बैठक.
प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी
हिंगणघाट:- भारतीय जनता पार्टी हिंगणघाट ग्रामीण मंडळ हिंगणघाट च्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२१ अंतर्गत सर्व शक्ती केंद्र प्रमुख तसेच बूथ प्रमुख यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुधीर दिवे, आमदार समीरजी कुणावार, भाजपा वर्धा जिल्हा सरचिटणीस किशोरजी दिघे, जिल्ह्याचे कोषाध्यक्ष भुपेंद्रजी शहाणे, वसंतराव आंबटकर, जि.प. सदस्य नितीनजी मडावी, हिंगणघाट ग्रामीणचे अध्यक्ष, आकाश पोहणे, सुभाषजी कुंटेवार, गजाननराव कोल्हे, तुषार आंबटकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते..