‘रोझ डे’ दिवशी मुंबईत प्रियकराने प्रेयसीला पेट्रोल टाकून जिवंत पेटवल्याची धक्कादायक घटना, प्रियकरचा जागीच मृत्यू झाला.

47

‘रोझ डे’ दिवशी मुंबईत प्रियकराने प्रेयसीला पेट्रोल टाकून जिवंत पेटवल्याची धक्कादायक घटना, प्रियकरचा जागीच मृत्यू झाला.

In 'Rose Day', in Mumbai, a lover threw petrol on his girlfriend and set her on fire. The boyfriend died on the spot.
In ‘Rose Day’, in Mumbai, a lover threw petrol on his girlfriend and set her on fire. The boyfriend died on the spot.

राज शिर्के प्रतीनिधी

मुंबई:- आज सर्वीकडे क्रूरते मध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. प्रेमा साठी अनेक प्रेमी युगुलाने आत्महत्या केली, किव्हा प्रेमीने आपल्या प्रेमीकाची हत्या केल्याचा अनेक घटना समोर येतात. आपल्या प्रेयसीवर पेट्रोल टाकूण जाळल्याची अशीच एक घटना मुंबई वरुन समोर येत आहे.

 7 फेब्रुवारीपासून प्रेम व्यक्त करण्याचा आठवडा सुरु झाला आहे. पहिल्याच दिवशी मुंबईत प्रियकराने प्रेयसीला पेटवल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील जोगेश्वरीमध्ये प्रियकरानं प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळलं. त्यानंतर प्रेयसीने पेटलेल्या अवस्थेत प्रियकराला मिठी मारली. त्यामुळे प्रियकरचा जागीच मृत्यू झाला असून प्रेयसीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजत आहे.मृत तरुणाचे नाव विजय खांबे असून त्याचे आपल्या भावाच्या धाकट्या मेव्हणीशी गेल्या अडीच वर्षापासून प्रेमसंबंध होते. विजयला त्याच मुलीशी लग्न करायचं होतं. परंतू विजय व्यसनाच्या आहारी गेला असल्यानं प्रेयसीच्या आई-वडिलांनी त्याचा लग्नाचा प्रस्ताव फेटाळला होता. दरम्यान, विजयने पीडित मुलीला लग्न करण्यास हट्ट करत होता, त्यामुळे तो तिला त्रास देत होता. विजयच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं एकेदिवशी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रुग्णालयात आठवडाभर  उपचार घेतल्यानंतर पीडित घरी आली होती. त्यावेळी विजय पुन्हा तिला भेटण्यासाठी गेला होता. त्याने आपल्यासोबत पेट्रोलची बाटली आणली होती.

पीडित घरी एकटीच असल्यामुळे विजयने संधी साधून घरात प्रवेश केला. विजय आणि पीडितेमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर त्याने आपल्यासोबत आणलेली पेट्रोलची बाटली पीडितेच्या अंगावर ओतली पेटवून दिले. तरुणीने जिवाच्या आकांताने आरडाओरडा करत होती, पण विजय हा दारातच उभे राहून सर्व पाहत होता. काही वेळानंतर तरुणीने पळत जात विजयला मिठी मारली. विजयने स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न केला पण तरुणीने त्याला काही सोडले नाही.

दोघेही पेटलेल्या त्याच अवस्थेत घराच्याबाहेर आले आणि कोसळले. त्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेऊन आग विझवली. दोघांनाही तातडीने जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आगीत होरपळून विजय 90 टक्के भाजला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून मृत्यूशी झुंज देत आहे. पीडित मुलीच्या भावाच्या तक्रारीवरुन मेघवाडी पोलीस स्टेशनमध्ये विजय खांबे विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे.