समुद्रपूर येथे भारतीय जनता पार्टी व भाजयुमो बूथ संपर्क अभियान कार्यकर्ता व पदाधिकारी बैठक संपन्न.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी
समुद्रपूर:- बैठकीला भाजपाचे प्रवक्ते तथा आमदार गिरीश व्यास तसेच कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार, भाजपा वर्धा जिल्हा महामंत्री किशोर दिघे, भाजपा वर्धा जिल्हा संघटन मंत्री अविनाश देव, समुद्रपूर भाजपा मंडळ प्रभावी संजय तडस, भाजपा तालुका प्रमुख संजय डेहने, जिल्हा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष वरून पाठक, भाजपा विधानसभा प्रमुख योगेश फुसे, समुद्रपूर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष गजाननराव राऊत, तालुका महामंत्री वामनराव चंदनखेडे व इतर मान्यवर बूथ प्रमुख तसेच शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते
या बैठकीला सर्वप्रथम किशोरजी दिघे यांनी मार्गदर्शन केले तसेच जिल्हा संघटनमंत्री अविनाश देव यांनी मार्गदर्शन केले विशेष पाहुणे म्हणून आमदार गिरीश व्यास भाजपा प्रवक्ते यांनी समुद्रपूर तालुक्यातील बुथ प्रमुख यांची माहिती जाणून घेतली निवडणुकीमध्ये बुथ प्रमुखांची काय काय भूमिका असतात हे सुद्धा आवर्जून सांगितले इतकेच नाही तर तालुक्यातील कोणत्याही बुथवर जाऊन त्यामध्ये बैठक सुद्धा घेईल असे सांगितले.
यानंतर सभेला अध्यक्ष म्हणून आमदार समीरभाऊ कुणावार यांनीसुद्धा तालुक्यात 126 बूथ ची माहिती दिली व 22 शक्ती केंद्र प्रमुखांची सुद्धा माहिती दिली. बूथ जर चांगले ताकतवान असले तर आपल्याला कोणतीही निवडणूक अगदी सोपी व सरळ पद्धतीने जिंकता येईल तेव्हा बूथ मध्ये काम करणाऱ्यांनी अगदी ताकतीने व प्रामाणिकपणे काम करावे विशेष करून नगरपरिषदा, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकीत सुद्धा ह्या सर्व गोष्टीचा फायदा होईल तेव्हा जे-जे बूथ प्रमुख आहे त्यांनी आपापल्या बूथ ची बैठक घ्यावी जेणेकरून येणारी कोणतीही निवडणूक सहज व सोपी जाईल असे बैठकीमध्ये मार्गदर्शन केले. या बैठकीमध्ये जिल्हा परिषद सर्कल प्रमुखांची व पंचायत समिती सर्कल प्रमुख यांची नियुक्ती आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते करण्यात आली. सदर बैठकीला समुद्रपूर शहरातील सर्व नगरसेवक व नगरसेविका, सोबतच समुद्रपूर तालुक्यातील सर्व भाजपा व युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.