The workers of Alana Company in Aurangabad district could not get provident fund.
The workers of Alana Company in Aurangabad district could not get provident fund.

औरंगाबाद जिल्हातील आलाना कंपनीच्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी मिळता मिळेना.

आलाना कंपनीच्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी मिळावा या मागणीसाठी कामगार व रोजगार मंत्रालयाच्या आयुक्तांना विविध संघटनांकडून दिले निवेदन

 The workers of Alana Company in Aurangabad district could not get provident fund.

औरंगाबाद:- मानव संरक्षण समिती नवी दिल्ली व पोलिस मित्र संघटना, नवी दिल्ली यांच्यावतीने आलाना कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी मिळावा यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कामगार व रोजगार मंत्रालय भारत सरकार, प्रादेशिक कार्यालय, औरंगाबाद येथील आयुक्तांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की फिगोरीफिको आलाना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, गेवराई – पैठण रोड, औरंगाबाद येथील शेकडो कामगारांचा (पीएफ फंड) भविष्य निर्वाह निधी हडप करण्यात आला असून त्या कामगारांवर अन्याय झाला आहे तसेच कामगारांचे मागील पाच ते दहा, दहा ते पंधरा, आणि 25 ते 30 वर्षापूर्वी चे कामगार पीएफ फंडापासून कंपनीचे मालक व व्यवस्थापक यांनी जाणून-बुजून कामगार यांना त्यांच्या हक्काच्या भविष्य निर्वाह निधी पासून वंचित ठेवले आहे कामगारांनी कंपनीच्या व्यवस्थापकास सर्व कागदपत्र दिले होते परंतु त्यांनी पुरावे नष्ट केले आहे व कामगारांचा कंपनीने कोणताही पुरावा जसे हजेरी मस्टर व बँक खाते ठेवले नाही त्यांना मागील पंचवीस ते तीस वर्षापासून रोखीने पगार अदा केले जात होते या प्रकारामुळे कामगारांची आज आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे यातील काही कामगार मृत्यू पावले आहेत. किमान 360 ते 390 कामगार हे पीएफ फंडा पासून वंचित आहेत. अशा आशयाचे निवेदन मानव संरक्षण समिती, नवी दिल्ली, व पोलिस मित्र संघटना, नवी दिल्ली, यांचेमार्फत दिनांक 2/2/2021 रोजी मानव संरक्षण समितीचे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात जनसंपर्क अधिकारी गजानन भगत, मानव संरक्षण समितीचे, उत्तर महाराष्ट्र हेड निरीक्षक, प्रमोद बिरारी, मानव संरक्षण समितीचे, औरंगाबाद ग्रामीण जिल्हा जनसंपर्क अधिकारी, सलीम खान शब्बीर खान, तसेच फिरोज खान शौकत खान, सुनील औचरमल, यांचेमार्फत देण्यात आले.

याअगोदरही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा अध्यक्ष सुनील औचरमल, सदानंद धांडे मित्र मंडळ, आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवळी गट मराठवाडा उपाध्यक्ष एडवोकेट जगन साळवे यांच्यामार्फत दिले गेलेले आहे.
यावेळी, सुनील औचरमल, जगन साळवे, सुनील खरात, किशोर जाधव, मिलिंद मूकळे, शिवाजी नरवाडे, सदानंद धांडे, सलिल खान मुलानी, नदिम मिर्झा, अजहर मिर्झा यांचे सह आलाना कंपनीत काम करणाऱ्या महिला अंजू आतार, शाईन शेख, शकिला शेख इब्राहिम, मदिना शेख यांच्यासह असंख्य महिला व कामगार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here