धान खरेदीला 31 मार्च पर्यंत मुदत वाड द्या.

51

धान खरेदीला 31 मार्च पर्यंत मुदत वाड द्या.

धान खरेदीला 31 मार्च पर्यंत मुदत वाड द्या.

✒ विनोद कोडापे✒ गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
8380802959.

गडचिरोली, खरीप हंगाम 2021,2022 या वर्षात आधारभूत धान खरेदीची मुदत 8 फेब्रुवारी पर्यंत वाढविण्यात आली आहे. परंतु या अल्प कालावधीत संपूर्ण शेतकऱ्यांना धान विक्री करणे शक्य नाही. त्यामुळे धान खरेदीला 31 मार्च पर्यंत मुदत वाड देण्यात यावी. शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. मात्र अनेक शेतकरी नोंदणी पासून वंचित राहिले. जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मडणीची कामे लांबणीवर पडली आहेत. ऑनलाईन नोंद करून सुद्धा काही शेतकर्यांचे धान विक्री साठी अजून नंबर लागलेला नाही. त्यामुळे शासनाने धान खरेदीला 31 मार्चपर्यंत मुदत वाड देण्यात यावी. अजून पन्नास हजार शेतकऱ्याचे धान विक्री बाकी आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, चामोर्शी, वडसा, कुरखेडा, एटापल्ली, सिरोंचं, भामरागड, कोरची,अहेरी, या सर्व तालुक्यात मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाकडे धान विक्री करिता नोंद केलेल्या अंदाजे पन्नास हजार शेतकऱ्याचे धान विक्री करणे बाकी आहे. त्यामुळे धान खरेदीला 31 मार्चपर्यंत मुदत वाड करण्यात यावी व सबंधित विभागाला आपल्या स्थरावरून आदेश द्यावे. जेणेकरून सर्व गरीब शेतकऱ्याचे पूर्ण धान विक्री झाली पाहिजे. असे गडचिरोली जिल्हयातील सर्व शेतकऱ्याचे म्हणणे आहे.