निसर्गसाथी फाउंडेशनच्या वतीने पक्षीनिरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन

63

निसर्गसाथी फाउंडेशनच्या वतीने
पक्षीनिरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन

निसर्गसाथी फाउंडेशनच्या वतीने पक्षीनिरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन

✍करन विटाळे✍
हिंगणघाट ग्रामीण तालुका
प्रतिनिधी – 88068 39078

हिंगणघाट : – रविवार रोजी निसर्गसाथी फाउंडेशन हिंगणघाट यांच्या वतीने पोथरा धरन येथे पक्षीनिरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,
लोकांमध्ये पक्षांबददल जनजागृती निर्माण व्हावी यासाठी निसर्गसाथी फाउंडेशन चे अध्यक्ष मा. प्रवीण कडू सर यांनी विविध जातीच्या पक्षांची ओळख करून दिली. आणि ३५ पक्षांची नोंद यावेळी करण्यात आली. त्यामध्ये
लाल भिंगरी, सामान्य गप्पीदास, आखुड बोटाचा सर्पगरुड, लाल सरि,माळभिंगरी, तलवार बदक असे अनेक पक्षी आढळून आले. व हा
कार्यक्रम मुख्य म्हणजे रोटरी क्लब हिंगणघाट यांच्या करिता आयोजित करण्यात आला होता. व यावेळी रोटरी क्लब चे अध्यक्ष जितेंद्र केदार, अजय मिहानी,कैफ पठाण, यांची सुद्धा उपस्थिती होती. असा आगळावेगळा कार्यक्रम पहिल्यांदाच पहिल्याने रोटरी क्लब च्या वतीने निसर्गसाथी फाउंडेशनचे आभार हि मानण्यात आले. आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करण विटाळे, चैतन्य वावधने यांनी प्रयत्न केले.