धान विक्रीस31मार्च2022पंर्यत मुदतवाढ देण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी –अनेक शेतकऱ्यांचे धानखरेदी केंद्रावर शिल्लक

52

धान विक्रीस31मार्च2022पंर्यत मुदतवाढ देण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी –अनेक शेतकऱ्यांचे धानखरेदी केंद्रावर शिल्लक

धान विक्रीस31मार्च2022पंर्यत मुदतवाढ देण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी --अनेक शेतकऱ्यांचे धानखरेदी केंद्रावर शिल्लक

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नागभीड – आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना धान विक्रीची मुदत ३१ जानेवारी वरून आज शेवटचा दिवस म्हणजे ८ फेब्रुवारी पर्यंत देण्यात आली आहे. असे असले तरी या मुदतीत शेकडो शेतकऱ्यांना धान विक्री शक्य झाली नाही.त्यामुळे या प्रक्रियेस ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची गरज निर्माण झाली आहे. मुदतवाढ न दिल्यास अनेक शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहणार आहेत.
येथील पणन महासंघाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्याची ३१ जानेवारी वरून आज शेवटचा दिवस म्हणजे ८ फेब्रुवारी २०२२ ही शेवटची तारीख देण्यात आली आहे.ही तारीख आज समाप्त होताच शेतकऱ्यांनी गेल्या तीनचार दिवसांपासून धानासह या आधारभूत केंद्रावर चांगलीच गर्दी करणे सुरू केले असून येणारे धान ठेवायचे कुठे हा प्रश्न खरेदी विक्री संघाच्या व्यवस्थापनासमोर पडला आहे.खरेदी विक्री संघाचा संपूर्ण आवार धानाच्या पोत्यांनी खचाखच भरून गेला आहे.
खरेदी विक्री संघाच्या या आधारभूत धान खरेदी केंद्रावर जवळपास 1850शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. नोंदणी करण्याऱ्यां शेतकऱ्यांनी या केंद्रावर आपले धान मोठ्ठा प्रमाणात धान संस्थेच्या आवारात शिल्लक आहेत,धान खरेदी न केल्यास अनेक ़शेतकरी धान विक्री पासून वंचित राहणार,

नागभीड येथील हे आधारभूत धान खरेदी केंद्र १ डिंसेबरला सुरु ़झाले.मधल्या काळात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या.त्यामुळे शेतकऱ्यांना धान मळण्या लांबवाव्या लागल्या.एवढेच नाही तर आधारभूत धान खरेदी केंद्रासमोरही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.या तांत्रिक अडचणींमुळे धान खरेदी झाली नाही,

॥प्रतिक्रिया॥
8फेब्रूवारी2022पंर्यत नोंदणी कृत शेतकऱ्यांची धान खरेदीची प्रक्रिया पूर्ण होते शक्य नाही, निदान 31मार्च पंर्यत मुद्दत वाढ हवी शिवाय आधारभूत धान खरेदी केंद्रावर असलेले शिल्लक धान शेतकरी वर्ग नेणार कि नाही ॽ हा प्रन्न संस्थेपुढे पडला आहे, या बाबत आम्ही जिल्हा मार्केटिंग अधिकारी मा, अनिल गोगीरवार साहेब यांना वरील मांगणी बाबत पञव्यवहार
केलेले आहेत, मुद्दत वाढ ची मांगणी पणॅ होण्याबाबत गाव्ही दिली,
आपले
ॲड, दिगंबर पाटील गुरुपुडे
अध्यक्ष खरेदी विक्री संस्था नागभिड