बहुजनांच्या आरक्षण विरोधी सरकार : अश्विन मेश्राम वंचित बहुजन आघाड़ी

50

बहुजनांच्या आरक्षण विरोधी सरकार : अश्विन मेश्राम
वंचित बहुजन आघाड़ी

बहुजनांच्या आरक्षण विरोधी सरकार : अश्विन मेश्राम वंचित बहुजन आघाड़ी

राहुल भोयर प्रतिनिधी ब्रम्हपुरी 9421815114

विश्रामगृह मध्ये वंचित बहुजन आघाड़ीची होणा-या प.स. , जि .प. निवडनुकी संदर्भात आढावा सभा घेण्यात आली. यावेळी तालुका निरीक्षक, जिल्हा सचिव अश्विन मेश्राम यांनी
कांग्रेस ,बीजेपी च्या नाकर्तेपनामुळे संविधानीक एस सी, एसटी चे पदोन्नति चे तर ओबीसी चे राजकीय आरक्षण गेले आहे. समोर शैक्षणिक , नौकरी चे आरक्षण विरोधी सरकार आरक्षण काढुन घेतील . भटक्या विमुक्त जातीतील लोकांना अनु:जाती मधुन मिळणा-या सवलती सरकार ने बंद केल्या . मुस्लिम समुदायाचे ५% शैक्षणिक आरक्षण लागू करण्यास कांग्रेस सरकार असमर्थता दाखवित आहे. ही सरकार बहुजनांच्या आरक्षण विरोधी सरकार आहे . या विरोधात वंचित बहुजन आघाड़ी ने वेळोवेळी आंदोलन केली. आणि हा लढा सामोर ही वंचित बहुजन आघाड़ी सुरु ठेवेल . येणा-या प . स जि . प च्या निवडणुका जनसामान्याच्या हक्कासाठी जनमानसाच्या सोबतीने संपुर्ण ताकदीने निवडणुक लढवेल . तालुका पदाधिकारी ,कार्यकर्त्यानी प्रेमळ भाषा , सुसंवाद , आपुलकी जोपासत बहुजनना सोबत घेऊन गाव शाखा गठन करीत संघटन मजबूत करावे व पक्षाचे विचार लोकांनपर्यत पोहचवावे असे मार्गदर्शन केले.
डाँ प्रेमलाल मेश्राम यांनी वंचित बहुजन आघाड़ी सर्वसामान्य लोकांचा पक्ष असुन संघटीत होण्याची गरज आहे असे म्हटले तर सुखदेवजी प्रधान यांनी ओबीसी समाजाला न्याय श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर हेच मिळवुन देऊ शकतात असे मत व्यक्त केले. सुत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले यावेळी पक्षाचे तालुका महासचिव लिलाधर वंजारी, महीला तालुका अध्यक्ष लिनाताई रामटेके, लता मेश्राम, प्रीती हुमणे, प्रमिला पाटील, नरेंद्र मेश्राम, प्रफुल ढोक,कमलेश मेश्राम, डि एम रामटेके , दिलीप प्रधान, वासुदेव गजभिये,धर्मप्रकाश शेंडे, सुरेश बागडे, अंनता मेश्राम, प्रकाश रामटेके, मनिषा उमक, निहाल ढोरे, अशोक शिंदे,वसंत खोब्रागडे, इतर कार्यकर्ते उपस्थित होते.