मुरमाडी/तुप आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा सत्कार शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्थेची सामाजिक बांधिलकी

53

मुरमाडी/तुप आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा सत्कार

शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्थेची सामाजिक बांधिलकी

मुरमाडी/तुप आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा सत्कार शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्थेची सामाजिक बांधिलकी

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी:-कोविड 19 संघर्ष काळात आपल्या जीवाची तमा न बाळगता, रुग्णांवर उपचार करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. खराशी येथील शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्थेच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
लाखणी तालुक्यातील मुरमाडी/ तुप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका भाग्यश्री हरिदास मदनकर, डॉ.स्नेहा घडले, डॉ.सोहम मरसकोल्हे यांचा सत्कार केला. शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्थेतर्फे वर्षभर सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रम राबविले जातात.
संस्थेचे संस्थापक तथा आदर्श शिक्षक डमदेव कहालकर हे या संस्थेचे संचालन करतात. कोविड काय असतो, हे त्यांनी स्वतःजवळून बघितले आहे.त्यांनी आरोग्य केंद्रांची अवस्था जाणून घेतली. आरोग्य कर्मचारी कसे जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडतात, कहालकर यांना आलेला अनुभव व त्यातून आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेली सेवा पाहून प्रभावित झाले. यातूनच त्यांनी संस्थेच्या माध्यमातून त्यांचा यथोचित सत्कार करण्याचा चंग बांधला. कोविड योद्धा म्हणून त्यांचाही सत्कार व्हावा. सद्भाव, सहानुभूती, प्रेम, जिव्हाळा समाजाने त्यांना देत कृतज्ञता प्रकट करावी, म्हणून हा सत्कार समारंभ घडवून आणण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योग प्रचारक सुनील भाग्यवाणी हे होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी व सत्कारमूर्ती कर्मचाऱ्यांनी आपले अनुभव व्यक्त केले.