समर्थ महाविद्यालयात लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी:-स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखणी द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय येथे आज भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगंबर कापसे होते. तर प्रमुख अतिथी मध्ये डॉ अनिता दाणी व प्रमुख वक्ते म्हणून डॉ धनंजय गभने होते. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकीत डॉ धनंजय गभने यांनी लता मंगेशकर यांना नागपूर येथे प्रत्यक्षात बघितल्यानंतर व ऐकल्यानंतर च्या आठवणी त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. डॉ दाणी यांनी लता मंगेशकर यांच्या संगीतमय जीवनाच्या वसा कसे पुढे नेता येईल यावर आपले विचार मांडले. या भाषणात प्राचार्य डॉ कापसे यांनी एकूणच लता मंगेशकर यांच्या संगीत आणि देशाचा अभिमान याबाबत चिंतनशील वक्तव्य त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमात संगीत शिक्षक प्रा राखी बावनकुळे यांनी लता मंगेशकर यांची गाणी कार्यक्रमादरम्यान गायन केली यामुळे त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. याप्रसंगी प्राध्यापक धनंजय गिरीपुंजे, प्रा रीना साठवणे यांनी श्रद्धांजलीपर आपले विचार मांडले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील लालचंद मेश्राम, सौ सुनंदा रामटेके, डॉ सु. बंस्पाल, सौ अनिता दाणी, डॉ सौ संगीता हाडगे, प्रा बाळकृष्ण रामटेके, प्रा रामभाऊ कोटांगले, धनंजय गोऱ्हेपूंजे, अशोक गायधनी, प्रशांत वंजारी, मंगेश शिवरकर, प्रणय भांडारकर, शाम पंचवटे, दिनेश सलामे, रोशन सिंगणजुडे, मालन सरोते, वि रामटेके, मोहन कावळे, रितेश झलके, जगदीश टेकचांद खवसकर, सचिन भांडारकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन प्रा अजिंक्य भांडारकर यांनी तर आभार प्रा वैशाली लिचडे यांनी मानले.