राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांच्या दोन व्हिडिओ सध्या जिल्ह्यात चर्चेच्या विषय ठरले

54

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांच्या दोन व्हिडिओ सध्या जिल्ह्यात चर्चेच्या विषय ठरले

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांच्या दोन व्हिडिओ सध्या जिल्ह्यात चर्चेच्या विषय ठरले

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी/भंडारा:- जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय ठरले तुमसर मोहाडी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांच्या दोन व्हिडिओ सध्या जिल्ह्यात चर्चेच्या विषय ठरले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्या च्या मुलीच्या लग्नात चक्क डिजेवर तालाचा फिरण्याच्या व्हिडिओ फार मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर वायरल झाला तर दुसरा व्हिडीओ अधिकाऱ्यांना अश्लिल भाषेत शिविगाळ करतांनाचा एक व्हिडिओ वायरल झाला आहे. त्यामुळे अवघ्या महिन्याभरात आमदार साहेबाचा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
यापूर्वी नववर्षाच्या सुरुवातीला पोलिस कर्मचाऱ्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करतानाचा आमदार राजु कारेमोरे यांचा व्हिडीओ वायरल झाला होता. त्या प्रकरणी त्यांना १२ तासाची तुरुंगाची हवा देखील खावी लागली होती. त्यानंतर आता बांधकाम विभागातील कर्मचारी आणि कंत्राटदाराला अश्लिल भाषेत शिविगाळ करतानाचा आमदार राजु कारेमोरे यांचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच फिरत आहे. मोहाडी तालुक्यातील धोप गावातील खराब रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी व कंत्राटदाराला जाब विचारताना पुन्हा आमदार साहेबाची जीभ घसरली आहे.
त्यामुळे जामिनावर सुटलेल्या आमदारांना अजुन सुद्धा कायद्याच्या धाक नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे नुकताच एका लग्नात डीजेवर ताल धरतांनाचा त्यांच्या व्हिडीओ चर्चेत आला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांना अश्लिल भाषेत दमदाटी आणि शिवीगाळ करतांनाचा त्यांच्या दुसरा व्हिडिओ वायरल झाल्याने पुन्हा आमदार साहेब जिल्ह्यात चर्चेचे विषय ठरला आहे.