मतदार संघातील विकास कामांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर, आ. किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश, अनेक विकास कामांना मिळणार गती
अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
मो:8830857351
चंद्रपूर : आ. किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपुर्ण प्रयत्नांना यश आले असुन मतदार संघातील विविध विकास कामांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 5 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या निधीतून मतदार संघातील प्रलंबीत विकास कामांना गती मिळणार आहे.
चंद्रपूर मतदार संघाचे अपक्ष आ. किशोर जोरगेवार यांच्या वतीने अनेक विकासकामे केल्या जात आहे. विविध विभागाअंतर्गत आ. किशोर जोरगेवार यांनी मतदार संघाच्या विकासासाठी मोठा निधी खेचुन आनला आहे. या निधीतून शहरी भागासह ग्रामिण भागाचा विकास केल्या जात आहे. या निधीतून सामाजिक सभागृह, अभ्यासिका यासह ईतर मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.
दरम्यान मतदार संघातील प्रलंबीत कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आ. जोरगेवार यांच्या वतीने सामाजिक न्याय विभागाला करण्यात आली होती. या मागणीचा त्यांच्यावतीने सातत्याने पाठपुरावा सुरु होता. अखेर त्यांच्या मागणीला यश आले असुन मतदार संघातील विकासकामांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतील दोन कोटी रुपयातुन बाबुपेठ येथील महादेव मंदिर समोरील खुल्या जागेवर अभ्यासिका व व्यायाम शाळेचे काम केल्या जाणार आहे. तर पागलबाबा नगर येथे समाज भवन, घुग्घुस येथील बौध्द स्मशान भुमी येथे शेडचे बांधकाम, घुग्घुस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे सौदर्यीकरण, चंद्रपूर येथील राजिव गांधी नगर येथे स्मशान भुमीचे विकास काम आदि कामे केल्या जाणार आहे. हा निधी उपलब्ध करुन दिल्या बद्दल आ. जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.