डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्था, नावडे यांच्या वतीने महामाता रमाई यांची १२५ वी जयंती
सचिन पवार
रायगड ब्युरो चीफ
मो:8080092301
पनवेल :-डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्था, नावडे यांच्या वतीने महामाता रमाई यांची १२५ वी जयंती प्रथमच मोठ्या धूमधडाक्यात साजरी करण्यात आला काल दिनांक ७ फेब्रुवारी माता रमाई यांची संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातही साजरी केली जाते. याच प्रमाणे नावडे परिसरात नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या “डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्थेची स्थापना झाल्यानंतर प्रथमच एका चांगल्या उपक्रमाची एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरूवात माता रमाई च्या जयंती ने करण्यात झाली.सदर या संस्थेच्या कार्याची नावडे गाव व काॅलनी मध्ये दिवसभर चर्चेचा विषय ठरला.
सदर कार्यक्रमाची सुरूवात महामानवांंना पुष्पहार व मेणबत्ती प्रज्वलित करून त्रिशरण पंचशील घेऊन करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अॅड. सविता गायकवाड यांनी भूषविले. तसेच यावेळी आयु. राजाराम कांबळे, डाॅ.अपर्णा गायकवाड, आजाद समाज पार्टी च्या महाराष्ट्र महिला आघाडी च्या प्रदेश अध्यक्षा आयु. नेहा ताई शिंदे,संस्थेचे उपाध्यक्ष आयु.भिमराव कांबळे, व इ. ६.वी मध्ये शिकणारी कु. अनन्या गायकवाड हिने माता रमाई च्या जिवनावर सुंदर भाषण केले.
संस्थेला नेहमी मार्गदर्शन करणारे.व नेहमी सहभागी होणारे, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य आयु.भिमराव कांबळे,(उपाध्यक्ष) आयु.राजाराम कांबळे,आयु.आदीनाथ बनसोडे,आयु.मारुती तरकसे,आयु.अशोक जाधव. यांच्या सह आयु.निराबाई गायकवाड, आयु.कृष्णाबाई गायकवाड, आयु.गुणाबाई गायकवाड या जेष्ठ वडील धारी मंडळींचा तसेच उपस्थित पाहूण्यांपैकी आयु.नेहाताई शिंदे (आ स.पा.महीला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा)आयु.उषाताई अहिरे(आ.स.पा) महाराष्ट्र उपाध्यक्षा) यांचा संस्थेचे अध्यक्ष आयु. विलास गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.शेवटी संस्थेचे अध्यक्ष आयु. विलास गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले