११५ क्विंटल चा साठा जळून खाक झाला.

66

११५ क्विंटल चा साठा जळून खाक झाला.

त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो 9096817953

उमरेड .( बेला. आष्टा ) वेजेचा केबल पडून ११५ क्विंटल कापसाचा साठा जळून झाली राखरांगोळी
बेला नजीक असलेल्या आष्टा येथील प्रगतिशील शेतकरी रमेश शामराव सुरकार व मनोहर शामराव सुरकार या दोन्ही बंधूचा कापसाचा साठा घरी साठविला असता आज दि. ८ फरवरीला पहाटे तीनच्या सुमारास इलेक्ट्रिक केबल तुटल्याने घरातील साठवून असलेला कापसाचा ११५ क्विंटल चा साठा जडून खाक झाला. यात साडेनऊ लाखाचे नुकसान झाल्याचे सांगितले.

इलेक्ट्रिक विभागाचे वीज चोरीचे प्रमाण कमी व्हावे म्हणून अॅल्युमिनियम ताराच्या ठिकाणी बंद
केबल टाकण्याचे काम सुरू आहे परंतु सूरकारांच्या घराजवळ दोन खांब्यातील अंतर लांब व वाकडेतिकडे असल्याने खांबावरची इलेक्ट्रिक केबल मनोहर सुरकर यांच्या टीनाच्या घरावर आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास पडली. इलेक्ट्रिक केबल ने टीन गरम व करंट येऊन खाली घरात असलेला कापसाने पेट घेतला. पहाटे उठणाऱ्या मंडळीच्या लक्षात येताच आगीच्या रुद्र रूपाने कापसाने पूर्णता पेट घेतला. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या गलथान कारभार चे भांडे उघडे पडले जीवित हानी झाली नसली तरी घरातील व कापूस मिळून महसूल विभागाने साडेनऊ लाखाचे नुकसान झाल्याचे कळविले.