अहमदनगर मुलीने केला अंतरजातीय प्रेमविवाह, भाजपा तालुकाध्यक्षाचा जावयावर प्राणघातक हल्ला.

57

अहमदनगर मुलीने केला अंतरजातीय प्रेमविवाह, भाजपा तालुकाध्यक्षाचा जावयावर प्राणघातक हल्ला.

 Ahmednagar girl commits inter-caste love marriage, BJP taluka president's attack on Java.

अहमदनगर,दि.8 मार्च :- जिल्हातील पाथर्डी येथे भाजपाच्या तालूका अध्यक्षाने आपल्या मुलीचा नव-यांवर जावयावर प्राणघातक हल्ला केला आहे. मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासऱ्याने जावयाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अहमदनगरमधील पाथर्डी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांचा समावेश आहे. या प्रकरणी दहा जणांविरोधात नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मारहाण करण्यासाठी सुपारी देऊन खेडकर यांनी काही गुन्हेगार सोबत आणल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी हत्यारांसह सात जणांना अटक केली, तर तिघे फरार आहेत. 

प्रेमविवाह केलेल्या प्रशांत उर्फ बंटी राजेंद्र वाघ याने दिलेल्या फिर्यादीवरुन भाजपाचे पाथर्डी तालुका अध्यक्ष माणिक खेडकर, हृषिकेश खेडकर, प्रदीप गायकवाड, बळीराम अर्जुन मिरगे, अमोल भीमराज कानोजे, शाहिद सय्यद, नारायण हरिभाऊ चव्हाण, तात्यासाहेब जगदाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. अटक केलेले आरोपी हे बीड जिल्ह्यातील शिरूर येथील आहेत. त्यांच्याकडून एक मोटार, एक पिस्तुल, एक एअरगन, चाकू, गुप्ती ही हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, त्यांचा चुलत भाऊ आणि हृषिकेश खेडकर हे फरार आहेत.

पोलिसांनी तीन गाड्यांसह सात जणांना ताब्यात घेतले. परंतु माणिक कोंडिबा खेडकर, ऋषिकेश खेडकर आणि त्यांचा भाऊ हे वेगळ्या वाहनाने फरार झाले, अशी फिर्याद प्रशांत वाघ याने नेवासे पोलिसात दिली. दरम्यान, पोलिसांनी सध्या सात जणांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आर्म अॅक्ट दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक विजय करे करत आहेत.