महिलांना आत्मनिर्भर बनवणारा अर्थसंकल्प : आमदार प्रतिभाताई धानोरकर

52

महिलांना आत्मनिर्भर बनवणारा अर्थसंकल्प : आमदार प्रतिभाताई धानोरकर

अर्थसंकल्पात दादांनी बहिणीला दिली भेट

 Budget to make women self-reliant: MLA Pratibhatai Dhanorkar

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- आज जागतिक महिला दिनी बहिणींना आत्मनिर्भर बनविण्याकरिता दादांनी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. या योजनांच्या माध्यमातून पुरोगामी महाराष्ट्रातील महिला सावित्रीच्या लेकी म्हणून सक्षम होणार आहे.

त्यासोबतच या पुढे महिलांच्या नावाने घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सूट मिळणार आहे. वाढत्या महिलांवरील अत्याचाराला आळा बसण्याकरिता राज्य राखीव पोलीस दल महिलांसाठी स्वतंत्र गट स्थापन होणार आहे. विद्यार्थिनींना शहरात जाऊन शिकता यावे यासाठी मिळणार मोफत बसची सुविधा उपलब्ध होणार आहे.

आजच्या अर्थसंकल्पात महिला दिनी पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा सन्मान केला. महिला आमदार म्हणून हा अर्थसंकल्प बघून महिलांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक कवच दिले आहे. त्याबद्दल मी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन.